पिंजर पोलिसांकडूनअवैध देशी दारूअड्ड्यावर छापा

ऑपरेशन प्रहार अंतर्गत दारू अड्ड्यावर छापा

बार्शीटाकळी – तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मौजे कानडी (बाजार) येथील

एका देशी दारु अड्ड्यावर पिंजर पोलिसांनी छापा घालून १ लाख 26 हजार चा मुद्देमाल जप्त केला,

त्यामुळे पिंजर परिसरातीलअवैध धंद्यावाल्यांचे धाबे दणाणले असल्याचे चित्र आहे,

स्थानिक कानडी येथील आरोपी अमर उद्धव घोडे , राहणार टेंभी, वय 29 वर्ष,

आणि जनार्दन तुकाराम खंडारे,वय 70 वर्ष राहणार विराहित

याचे देशी दारू अड्ड्यावर बुधवारी छापा टाकला असता आरोपीकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे,

सन्माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या ऑपरेशन प्रहार मोहिमेंतर्गत

पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय अभिषेक नवघरे,

कानडी बीटचे जमादार दत्तात्रय चव्हाण, जमादार नामदेव मोरे, प्रदीप धामणे,

नागसेन वानखडे, गजानन काळे, नरहरी देवकते, भागवत गांजवे, मयूर खडसे,

भूषण मुखमले, होमगार्ड सैनिक गणेश जानोरकर, यांच्यासह पुढील तपास पिंजर पोलीस करत आहे

Read also :   https://ajinkyabharat.com/khamgaon-polysanni-sharp-action/