पिंपळखुट्याच्या दलित वस्तीतील रस्ते बनले गटारे, डासांचे साम्राज्य वाढले

गटारांमुळे नागरिकांचे पायी चालणं देखील दुर्गम

पातुर तालुक्यातील पिंपळखुटा गावातील दलित वस्ती ब मधील रस्त्यांची अवस्था गंभीर झाली आहे. जलजीवन मिशन अंतर्गत नळ जोडणीसाठी रस्त्यांची मोठ्या प्रमाणात तोडफोड करण्यात आली असून पावसाचे पाणी साचून मोठमोठे खड्डे आणि गटारे बनले आहेत. या गटारांमुळे मलेरिया, डेंगू, ताप, हिवताप यांसारख्या साथीच्या रोगांचे संकट वाढले आहे.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, पावसाळा सुरू झाल्यापासून रस्त्याची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. अनेक वर्षे कच्च्या असलेल्या रस्त्याची तोडफोड करण्यात आल्याने आता ती पूर्णतः गटारात व चिखलात परिवर्तित झाली आहे. पिंपळखुटा दलित वस्ती ब मधील नागरिकांना पायी चालत देखील त्रास होतो आहे.अनिल कवळे नामक स्थानिक नागरिक म्हणतो, “माझ्या घरासमोरील रस्ता पूर्णपणे चिखलमय व पाण्याची गटार झालेली आहे. नागरिकांना डासांमुळे साथीच्या रोगांची भीती आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना करावी.”ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करण्याची आणि कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी केली आहे. मंगरपंचायतीच्या दुरुस्तीच्या कामात फारसे यश आलेले नाही, असेही काही नागरिकांचे मत आहे.प्रशासनाने या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन त्वरित कारवाई करण्याची गरज आहे.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/addiction-and-mental-azaracha/