शहरातील एका धार्मिक स्थळावर स्थानिक प्रशासनाने अंमलबजावणी केली असून,
त्यामुळे संबंधित समाजात तीव्र नाराजी उसळली आहे.
या कारवाईला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी परिसरात गर्दी केली.
प्रशासनाने लावलेली ताडपत्री काढण्याचा प्रयत्न करत असताना आंदोलक
आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाली. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न
निर्माण होऊ नये म्हणून काही काळासाठी आंदोलन स्थगित करण्यात आले.
प्रशासनाच्या म्हणण्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात येत आहे.
मात्र संबंधित नागरिकांचा याला तीव्र विरोध असून, या प्रकारामुळे धार्मिक
भावना दुखावल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/jillha-parishad-school-and-junior-college-agaon-bu-yehe-and-plantation-program/