पिडीत महिलेवर एका 35 वर्षीय युवकाने केला लैगीक अत्याचार 

महिलेवर

रिसोड : तुझ्या मुलीचे लग्न लावून देतो तुला कोणत्याही प्रकारची कमी पडू देणार नाही तू माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव असे विविध प्रकारचे अमिष दाखवून शहरातील एका 35 वर्षीय महिलेवर एका 35 वर्षीय युवकाने सहा वर्षापासून वारंवार लैगीक अत्याचार केल्याप्रकरणी सदर युवका विरोधात रिसोड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेश नंदकिशोर भांदुर्गे वय 35 वर्ष असे आरोपीचे नाव असून त्याचे विरोधात दिनांक 12 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार रिसोड शहरातील एका 35 वर्षीय पिडित महिलेने रिसोड पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, नागेश नंदकिशोर भांदुर्गे हा व्यक्ती तिच्या ओळखीचा असून व्यवसायातून त्याची ओळख झालेली होती. आरोपी नागेश नंदकिशोर भांदुर्ग यांच्याकडून ती व्यवसाय विक्रीसाठी त्याच्याकडून माल घ्यायची. सदर पिडीत महिलेचा पती हा व्यसनाधीन असल्याने नागेश भांदुर्गे याने सदर महिलेचा गैरफायदा घेतला असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.जुलै 2019 पासून नागेश नंदकिशोर भांदुर्गे यांने त्याच्या शेतात नेऊन वारंवार शारीरिक संबंध केले. दिनांक 7 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी चार वाजता च्या दरम्यान नागेश भांदुर्गे हा सदर महिलेच्या दुकानावर आला व तिला शेतात येण्याचे सांगितले. सदर पीडित महिला ही शेतात गेली असता नागेश भांदुर्गे याने त्याचे शेतातील गोठ्यामध्ये इच्छा नसताना त्याच्यासोबत शारीरिक संबंध केले. आरोपी नागेश भांदुर्गे याने पिडीताला सांगितले की, त्याच्या घरच्यांना सदर संबंधांबद्दल माहित झाले असून आता आपले संबंध तोडून टाकू. यावर पिडीतेने त्याला म्हटले की तू मला फसवले आहेस माझ्या गैरफायदा घेतलेला आहे यावर दोघांचे शाब्दिक चकमक झाल्याने नागेशने छापडाबुक्की, लोखंडी साखळीने मारहाण करत जखमी केले व जिवाने मारण्याची धमकी दिली. जखमी अवस्थेत पीडितेला रिसोड येथील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले होते तर तिथून डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी वाशीम येथे पाठवले होते. उपचारानंतर दिनांक 12 सप्टेंबर रोजी पिडीतेने फिर्याद दाखल केल्यानंतर रिसोड पोलिसांनी कलम 64 (1) 64 (2)(एम), 69, 118 (1) 352, 352 (3)नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष आघाव हे करीत आहेत.

read also :https://ajinkyabharat.com/customer-hitasathi-enlightened-mawa/