पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांची पाठ फिरवणं गंभीर -कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांची पाठ फिरवणं गंभीर

पिक विमा योजनेतून शेतकऱ्यांची पाठ फिरवणं गंभीर; लवकरच ठोस निर्णय – कृषिमंत्री दत्तात्रय भरणे

अकोला – यंदा प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्यापासून राज्यातील मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याची नोंद झाली आहे.

वाढलेले प्रीमियम, वेळेवर नुकसानभरपाई न मिळणे, तांत्रिक अडचणी आणि मागील दाव्यांचा अनुभव अशा अनेक कारणांमुळे

Related News

शेतकरी विमा घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालांतून समोर आले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकार लवकरच योग्य तो निर्णय घेईल आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी ठोस पावले उचलली जातील, असे आश्वासन राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

आज कृषिमंत्री झाल्यानंतर प्रथमच दत्तात्रय भरणे यांचे अकोल्यात आगमन झाले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अकोला रेल्वे स्थानकावर त्यांचे ताल-मृदंग आणि ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.

READ ALSO :https://ajinkyabharat.com/bharat-gogawale-mhanale-what-is-the-matter-of-foster-minister/

Related News