पवन कल्याण यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बऱ्याचदा चर्चेत येतं, कारण त्यांच्या तीन लग्नांनी नेहमीच मीडियाचं लक्ष वेधलं आहे.
पहिलं लग्न – नंदिनी
1997 मध्ये पवन कल्याण यांनी विशाखापट्टणममधील एका व्यावसायिकाची मुलगी नंदिनीशी लग्न केलं.
सुरुवातीला सर्व काही नीट चाललं, पण दोन वर्षांतच दोघांत मतभेद झाले आणि ते वेगळं राहू लागले.
2001 नंतर पवन रेणु देसाईसोबत रिलेशनशिपमध्ये आले, यामुळे नंदिनी आणि ते यांच्यातील दुरावा वाढला.
खटला आणि घटस्फोट
2007 मध्ये नंदिनीने त्यांच्यावर “द्विविवाह” (Bigamy) चा खटला दाखल केला.
तिचा आरोप होता की, घटस्फोट न देता पवनने रेणु देसाईशी लग्न केलं.
पुरावे अपुरे असल्याने कोर्टाने पवनला क्लिन चिट दिली, मात्र त्यानंतर त्यांनी स्वतःच घटस्फोटाची मागणी केली.
ऑगस्ट 2008 मध्ये घटस्फोट अधिकृतरीत्या झाला. सेटलमेंटमध्ये नंदिनीला ५ कोटी रुपये देण्यात आले.
घटस्फोटानंतर नंदिनी कुठे आहे?
घटस्फोटानंतर नंदिनी पूर्णपणे मिडियातून गायब झाली.
ती अमेरिकेत स्थायिक झाली असून एका एनआरआय डॉक्टरशी तिने लग्न केलं.
तिने आपलं नाव बदलून ‘जाह्नवी’ ठेवलं आहे.
गेल्या १६ वर्षांपासून ती पूर्णपणे लाईमलाइटपासून दूर आहे आणि स्वतःची प्रायव्हसी जपत आहे.
पुढचं वैयक्तिक आयुष्य
2009 मध्ये पवनने रेणु देसाईशी लग्न केलं. त्यांना दोन मुलं आहेत – अकीरा आणि आद्या.
2012 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
2013 मध्ये त्यांनी रशियन मॉडेल अन्ना लेझनेव्हा हिच्याशी तिसरं लग्न केलं. त्यांना देखील दोन मुलं आहेत.
म्हणजेच पवन कल्याण यांची पहिली पत्नी नंदिनी (जाह्नवी) आज अमेरिकेत स्थायिक असून,
समाजमाध्यमे व मीडियापासून पूर्णपणे दूर, वैयक्तिक आयुष्य जगत आहे.
Read also : https://ajinkyabharat.com/hyderabad-gazhetvron-nava-suit/