राज्यातील अनेक भागात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे.
हवामान विभागाने ५ ते ८ ऑगस्ट दरम्यान पूर्व विदर्भ,
मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.
५ ऑगस्टला नागपूर, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोलीसह नांदेड,
लातूर, धाराशिव, हिंगोली, परभणी, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पुढील चार दिवस पुणे, सातारा, कोल्हापूर, बीड, रायगड, रत्नागिरी,
सिंधुदुर्ग, नगर, वाशिम, अकोला, अमरावती अशा जिल्ह्यांत देखील पावसाची शक्यता आहे.
शेतकऱ्यांसह नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/mazool-week-rasta-mojani-and-seema-fixed/