काही दिवसात राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका आता भाजीपाला उत्पादनाला बसलाय.
पावसामुळे भाज्यांचा नुकसान झालं असून याचा भाजीपाला परिणाम झाला.
त्यामुळे होलसेल मार्केटमध्ये भाजीपाल्याचे दर 30% नी वाढलेत तर किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या किमती 80 ते 120 रुपये किलोच्या घरात पोहोचल्यात.
गेल्या तीन दिवसांपासून गाड्यांचे आवक कमी झाली आहे.
अकोल्याच्या गौरक्षण रोड वर नेहमीच्या 100 ते 150 गाड्यां असतात. मात्र आता 50 ते 60 गाड्यांची अवस्था झाली आहे.
दरम्यान मटार, गवार,भेंडी, दोडका, फरसबी, शेवगा या भाज्या 80 रुपयांच्या घरात गेल्यात तर टोमॅटो, वांगी, फ्लॉवर, सिमला मिरची या
भाज्या 60 रुपयांच्या घरात गेल्यात.
रानभाजी अर्थात करुटलं हे 80 रुपये पाव, 320 रुपये किलो पर्यंत भावात दर वाढ झाली आहे.
त्यामुळे ग्राहकांच्या आणि स्वयंपाक घरातील गृहिणीच्या पॉकेटला झळ बसणार आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kavayatrene-inzori-complex-dumdumoon-galle/