पातूरच्या चिमुकल्यांनी साकारले पर्यावरणपूरक बाप्पा : किड्स पॅरडाईजमध्ये कार्यशाळा

पातूरच्या चिमुकल्यांनी घडवले पर्यावरणपूरक बाप्पा

पातूर – किड्स पॅरडाईज पब्लिक स्कूल च्या चिमुकल्यांनी शाळू मातीपासून पर्यावरणपूरक गणपती बाप्पा घडवले. शाळेत नुकतीच घेण्यात आलेल्या

कार्यशाळेत विद्यार्थ्यांना स्वतःच्या इवल्या हातांनी गणेशमूर्ती घडविण्याचा आनंद लुटता आला.

पर्यावरणपूरक उपक्रम

“गणेश मूर्ती मातीची, पर्यावरणाच्या हिताची” हे ब्रीदवाक्य घेऊन किड्स पॅरडाईज पब्लिक स्कूलने गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सवाची

संकल्पना राबवली आहे. यावर्षीही त्याच परंपरेला पुढे नेत विद्यार्थ्यांसाठी शाळेत विशेष कार्यशाळा घेण्यात आली.

कार्यशाळेचे मार्गदर्शन

ही कार्यशाळा शाळेचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे आणि कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. विद्यार्थ्यांना

गणेशमूर्ती बनवण्याचे प्रशिक्षण शिक्षिका रेश्मा शेंडे यांनी दिले.

शिक्षक-शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग

या उपक्रमात मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नरेंद्र बोरकर, नितु ढोणे, संकल्प व्यवहारे, हरिष सौंदळे, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, अक्षय तायडे,

प्रतीक्षा भारसाकळे, प्रियंका चव्हाण, पूजा खंडारे, रेश्मा शेंडे, इकरा आदिबा खान, साक्षी वानखडे, शुभांगी बोरकर, दिव्या गव्हाळे, नयना पटोणे, प्रिया चक्रे,

गौरी अमानकर, रुपाली पोहरे, कल्पना वानेरे, शुभम पोहरे, मधुकर बोदडे यांसह अनेकांनी परिश्रम घेतले.

विद्यार्थ्यांचा संकल्प

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी आकर्षक गणेशमूर्ती घडवून पर्यावरणपूरक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला.

Read also :https://ajinkyabharat.com/akhher-maharashtra-st-worker-sanghatna-akola-department/