घरात घुसून बकरयावर हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण
पातूरच्या देवडी मैदान परिसरात राहणारे मोहम्मद जावेद यांच्या घरात आज पहाटे सुमारे ५ वाजता मोकाट कुत्र्यांनी थैमान घातले.
त्यांनी घरात घुसून चार बकर्यांवर हल्ला केला.
या हल्ल्यात चार ते पाच बकरींचा मृत्यू झाला असून,
त्याची अंदाजे किंमत सुमारे ६० ते ८० हजार रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.
पातूर नगर परिषद व शिर्ला ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अनेक भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा
वाढता त्रास याआधीही अनेकदा वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाला आहे.
मात्र, दोन्ही विभागांनी या बाबतीत अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतलेला नाही.
सध्या पातूर व शिर्ला ग्रामपंचायतीच्या अनेक भागांमध्ये मोकाट कुत्र्यांचा दहशत वाढत
असून नागरिकांकडून कठोर पावले उचलण्याची मागणी होत आहे.
मोकाट कुत्र्यांमुळे परिसरात भीतीचं वातावरण
स्थानिक नागरिकांनी सांगितले की, हे मोकाट कुत्रे इतके आक्रमक झाले आहेत की ते आता थेट घरात घुसून हल्ले करत आहेत.
त्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
जर हे मोकाट कुत्रे पाळीव जनावरांवर हल्ला करून त्यांना ठार मारू शकतात,
तर लहान मुलांवरही ते हल्ला करू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी दोन मुलांवर झाला होता कुत्र्यांचा हल्ला
पातूरच्या रेहान पार्क भागात याआधी दोन लहान मुलांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता,
ज्यात दोघेही गंभीर जखमी झाले होते.
त्याआधीही एका वृद्धावर मोकाट कुत्र्यांनी जीवघेणा हल्ला करून त्याचा मृत्यू घडवला होता.
मात्र, या सर्व घटनांनंतरही नगर परिषद आणि ग्रामपंचायत याकडे दुर्लक्षच करत आहेत.
Read Also : https://ajinkyabharat.com/naveen-ghar-ghenar-ahat-or-vastu-niranchi-gaya-nakki-kaji/
