पातुर येथे डोळे तपासणी शिबिर

नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पातुरमध्ये विशेष नेत्रतज्ञ शिबिर

पातुर  :भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पातुर येथे ग्रामीण आरोग्य आयुर्वेद महाविद्यालयात विशेष डोळे तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. या शिबिराचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांना मोफत नेत्रसेवा उपलब्ध करून देणे हा होता.

या शिबिरात आयुर्वेद नेत्रतज्ञ सौ. वर्षा देसाई, डॉ. संतोष खडसे, डॉ. संजय राठोड, डॉ. उन्नती सोनकर आणि अजमत खान यांनी रुग्णांची तपासणी करून सेवा प्रदान केली.

साप्ताहिक शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे संचालक डॉ. साजिद शेख यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्राचार्य सौ. जयश्री काटोले, उपप्राचार्य डॉ. अभय भुस्कडे, अधीक्षक डॉ. संतोष सोमानी, श्री. रामेश्वर घेघाटे, डॉ. राम शेगोकार, सुनील दाते, आर.एम.ओ. दिलीप आतकर, नवीन देवकर, सुनील पाटील, मनवर खान, वसंता पोहरे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाला रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.

मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या विनंतीनुसार, चॅरिटी कमिशनर मुंबई तसेच डिप्टी चॅरिटी कमिशनर अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले.

read also :http://ajinkyabharat.com/bharatache-6-kheladu-missing/