घरगुती वादातून इसमाचा निर्घृण खून
पातूर : घरगूती वादातून एकाच निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना पातूर तालुक्यातील ग्राम अंबाशी येथे घडल्याने परिसरात खळबळ उडाली.
प्राप्त माहितीनुसार पातूर तालुक्यातील ग्राम अंबाशी येथे आज दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी घरगुती वादाचे हाणामारीत रूपांतर होऊन एकाचा खून झाला आहे.घटनेबाबत सविस्तर वृत्त असे की अंबाशी येथील रहिवासी असलेल्या छाया हिवराळे हिचा विवाह अकोला तालुक्यातील कानशिवणी येथील रहिवासी असलेल्या नागेश पायरुजी गोपणारायण (वय अंदाजे ४० वर्ष)याच्याशी झाला असून सद्यस्थितीत तो पातूर तालुक्यातील असोला फाटा येथे राहत असून पत्नीचे माहेर असलेल्या अंबाशी येथील घरी आला असता नागेश व त्याच्या सासुरवाडीतील मंडळींमध्ये घरगुती वाद झाले असून वादाचे रूपांतर हाणामारीत झाले असता नागेश पायरुजी गोपणारायण याचा काठ्या,चाकू व कुऱ्हाडीचे वार करून खून करण्यात आला.दरम्यान पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड, चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार रविंद्र लांडे,पोहेकॉ. तारासिंग राठोड,वसंत राठोड, वसीमोद्दीन शेख,शंकर बोरकर,अनिता ,वसीम शेख,अनिल ठाकरे,अकरम पठाण यांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदना करिता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविला असून पुढील तपास पातूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हनुमंत डोपेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पातूर पोलीस करीत आहेत.
read also : https://ajinkyabharat.com/swayamashasan-program-chamle-shree-gurudev-vidya-mandirch-vidyarthi/