पातूर शहरात ‘रान कसायांची’ टोळी सक्रिय

पातूर शहरात 'रान कसायांची' टोळी सक्रिय

हायवे लगत झाडांना आग लावून पाडण्याचे कटकारस्थान; वनविभागाच्या निष्क्रियतेमुळे वाढत आहे धाडस

पातूर (ता.१८ एप्रिल): शहर व परिसरातील झाडे तोडण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असून

आता ‘रान कसायांनी’ थेट नॅशनल हायवे लगत असलेल्या मोठ्या झाडांनाही लक्ष्य बनवले आहे.

Related News

 पर्यावरणाचा समतोल ढासळवणाऱ्या या कृत्यामुळे परिसरातील निसर्गप्रेमींमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

गुरुवारी दुपारी अकोला-वाशिम महामार्गावर, जुन्या गॅस गोडाऊनसमोर रस्त्याच्या कडेला

असलेल्या एका मोठ्या निंबाच्या झाडाला अज्ञात व्यक्तींनी आग लावली.

झाडाचे मूळ भाग जळल्यामुळे झाड महामार्गावर कोसळले.

सुदैवाने त्या वेळी रस्त्यावर वाहनांची वर्दळ नव्हती, अन्यथा मोठा अपघात घडला असता.

पातूर नगर परिषदेच्या अग्निशामक पथकाने, ज्यात सैय्यद अश्फाक व प्रल्हाद वानखडे

यांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवत रस्ता मोकळा केला.

झाडांना आग लावून ‘कायद्यातून विक्री’?

सदर घटनेने एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

झाडे पाडण्यासाठी मुळाशी आग लावून ती रस्त्यावर पाडली जातात,

आणि नंतर “रस्ता मोकळा करण्याच्या” कारणावरून ती झाडे विभागीय अधिकाऱ्यांकडून

अत्यल्प दरात विकत घेतली जातात, असा आरोप पर्यावरण कार्यकर्त्यांकडून होत आहे.

या सर्व प्रकाराकडे नॅशनल हायवे अथॉरिटी (NHAI) आणि वनविभागाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे,

अन्यथा परिसरातील पर्यावरणाचा समतोल आणखी गंभीरपणे बिघडू शकतो.

चौकट: निसर्गाचा ऱ्हास – भविष्यासाठी धोका

झाडे ही केवळ सौंदर्यवर्धक नाहीत, तर पर्यावरणाचा मूलाधार आहेत. वृक्षतोड झाल्यास

हवामानातील असंतुलन, पावसाचे अनियमित वितरण, भूजल पातळीतील घट आणि

जैवविविधतेचा ऱ्हास होतो. परिणामी, भविष्यात शेती उत्पादन कमी होण्याची,

तापमान वाढण्याची आणि मानवी आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/akolidhi-good-freed-bhavikatene-sajra/

Related News