पातुर नंदापूरमध्ये हरणाचे मास विक्रीवर छापा, आरोपी जप्त

हरणाच्या शिकारीस आळा, मास विक्रेत्यावर कारवाई

पातुर नंदापूरमध्ये हरणाचे मास विक्रीवर छापा, आरोपी जप्त

पातुर नंदापूर- रोजी सकाळी 11 वाजता पातुर नंदापूर येथे फुलसिंग जाधव रा. कानडी ह.मु. पातुर नंदापूर हरणाचे

मास विक्रीसाठी(दि. 23 )ठेवताना पिंजर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात पकडले.पोलीसांनी घटनास्थळी पोहोचताच,

आरोपीकडून सर्व हरणाचे मास, मुंडके, वजन काटा, सुरा आणि MH30GB 7706 क्रमांकाची टू-व्हीलर जप्त केली.

आरोपीसह सर्व साहित्य वन विभाग अकोला आणि त्यांच्या अधिकाऱ्यांना सुपूर्द करण्यात आले.

या धडक कारवाईत पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली

पोलीस उपनिरीक्षक  अभिषेक नवघरे, सहाय्यक पो .उपनिरीक्षक दत्तात्रय चव्हाण, कॉ. नागसेन वानखडे, कॉ.नागेश दंदी

पोलीस वाहन चालक उपस्थित होते.

सदर कारवाईनंतर पुढील तपास वन विभाग अकोला आणि पिंजर पोलीस स्टेशन करत आहेत.

Read also :https://ajinkyabharat.com/bezbabdar-bandamamue-patur-rastyache-hall/