पातूर नंदापूर (ता. अकोला) : गुढीपाडवा व नववर्षाच्या शुभमुहूर्तावर श्री उमा महेश्वर संस्थान,
पातूर नंदापूर येथे भव्य दिव्य संगीतमय शिव महापुराण कथा,
शिवलीला अमृत ग्रंथ पारायण आणि अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
Related News
नांदेड मध्ये एका ट्रॅक्टरचा विचित्र प्रकारे अपघात, 6 ते 7 मजुरांचा मृत्यू
“१० लाख भरल्याशिवाय उपचार नाही”, गर्भवतीचा मृत्यू; पुण्यात संतापाची लाट
ईद साजरी करताना गंगा-जमूनी संस्कृतीचे दर्शन शिरखुर्मा वाटप करून सुधाकरराव नाईक शिक्षण संस्थांमध्ये ईद उत्सव उत्साहात
शेतकरी फार्मर आयडीसाठी दिंडी व विशेष शिबिराचे आयोजन
धावत्या रेल्वेखाली उडी घेऊन युवकाची आत्महत्या;
सोन्याच्या दरात विक्रमी वाढ! 90,000 पार; पण लवकरच मोठी घसरण येणार?
शैक्षणिक व अशैक्षणिक कामांच्या घेऱ्यात मुख्यालयाचा वाद !
सलमान खान भावूक: ‘सिकंदर’साठी सहकलाकारांकडून समर्थनाचा अभाव
खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची लोकसभेत जोरदार मागणी…..
रस्त्यांच्या समस्येवर उपाय – ग्रामशेतरस्ता समितीच्या स्थापनेसाठी शेतकऱ्यांची जोरदार मागणी
चोहोटा बाजार परिसरातील पाणीटंचाई
आठवपैल: एका आठवणीच्या किनाऱ्यावर
भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
गावकऱ्यांच्या विशेष आग्रहास्तव प्रथमच पातूर नंदापूर नगरीत शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले असून,
सुप्रसिद्ध कथा वाचिका ह.भ.प. सौ. सोनाली दीदी महाजन (आळंदी) यांच्या अमृतवाणीतून भक्तगण शिवलीला श्रवण करत आहेत.
दैनंदिन कार्यक्रम:
🔹 सकाळी 5 ते 6: काकडा भजन
🔹 सकाळी 9 ते 10: ह.भ.प. दिलीप महाराज इंगळे – शिवलीला अमृत वाचन
🔹 दुपारी 1 ते 4: शिव महापुराण कथा
🔹 सायंकाळी 6 ते 7: हरिपाठ
🔹 रात्री 7 ते 10: सुप्रसिद्ध कीर्तनकारांचे हरीकीर्तन
कीर्तन व शिवमहापुराण कार्यक्रमांचे वेळापत्रक:
30 मार्च 2025: ह.भ.प. केशव महाराज मोरे (म्हैसपूर)
31 मार्च 2025: ह.भ.प. राजेंद्र महाराज वक्ते
1 एप्रिल 2025: ह.भ.प. रवींद्र महाराज हरणे (मुक्ताईनगर)
2 एप्रिल 2025: बाल कीर्तनकार ह.भ.प. संस्कार महाराज आळसपुरे (आळंदीकर)
3 एप्रिल 2025: ह.भ.प. गोपाल महाराज सरकटे (आळंदीकर)
4 एप्रिल 2025: ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज बावस्कर (गाडेगाव)
5 एप्रिल 2025: ह.भ.प. सोनाली दीदी महाजन (आळंदी)
सकाळी 10 ते 12: काल्याचे कीर्तन
दुपारी 1 ते 4: महाप्रसाद
सायंकाळी 6 ते 9: नगरप्रदक्षिणा आणि पालखी सोहळा
भाविकांना आवाहन
गावकरी मंडळींनी या ऐतिहासिक शिव महापुराण कथेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
संपूर्ण कार्यक्रमाला पातूर नंदापूर आणि सोनखास ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.