पातूर : पातूर नगर परिषदेत कार्यरत असलेले ज्येष्ठ पदलिपिक
सैय्यद रसूल सैय्यद चांद यांचा सेवा निवृत्ती सोहळा नगर परिषद
कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला.
दीर्घ सेवाकाळात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव
करत सहकाऱ्यांनी त्यांचा मनःपूर्वक सत्कार केला.
नगर परिषदेच्या प्रगतीत त्यांनी बजावलेल्या योगदानाचा
उल्लेख मान्यवरांनी मनोगतात केला.
त्यांच्या सेवाभाव, कर्तव्यनिष्ठा आणि सहकाऱ्यांशी जपलेल्या
आपुलकीबद्दल विशेष कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमाला कर्मचारी संघाचे अध्यक्ष विश्वनाथ घुगे, श्री. लाकडे,
श्री. इंगळे, सादिक अली इंजिनीयर, गाझी उर रहमान, हाजी सैय्यद बुरहान,
सै. मुजाहिद इकबाल, परशराम उंबरकर, राजू उगले, गणेश गाडगे,
सचिन सुरवाडे, निरंजन बंड, मो. फरहान अमीन यांच्यासह
नगर परिषदेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी सहकाऱ्यांनी त्यांना पुढील आयुष्यासाठी निरोगी,
आनंदी आणि यशस्वी जीवनाच्या शुभेच्छा दिल्या.
टाळ्यांच्या गजरात सैय्यद रसूल चांद यांना भावपूर्ण
निरोप देत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.