पातूर-आगिखेड रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान,

पातूर-आगिखेड रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी; शेतकऱ्याचे मोठे नुकसान,

पातूर | प्रतिनिधी

अकोल्याच्या पातूर येथील T.K.V. चौक ते आगिखेड दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था आता गंभीर अपघातांना कारणीभूत ठरत आहे.

या खराब रस्त्यावर ट्रॅक्टर पलटी झाल्याने एका शेतकऱ्याच्या ज्वारीचे मोठे नुकसान झाले, तर स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Related News

या रस्त्याची अवस्था इतकी वाईट आहे की, पावसात त्या मार्गावरून पादचारी चालणेही धोकादायक ठरत आहे.

स्थानिक शाळा सुरू झाल्यामुळे लहान मुलं आणि त्यांचे पालक यांची रोज या रस्त्याने ये-जा सुरु असते.

याच रस्त्यावर चिखलामुळे अनेक वेळा गाड्या घसरून अपघात झाले आहेत, असं नागरिक सांगतायत.

नुकत्याच घडलेल्या ट्रॅक्टर अपघातात शेतकऱ्याच्या ज्वारी पिकाचं नुकसान झालं असून,

यामुळे शेतकरीही हवालदिल झाला आहे. या घटनेनंतर नागरिकांनी पुन्हा एकदा जिल्हाधिकाऱ्यांकडे

रस्ता दुरुस्तीची मागणी करत तात्काळ उपाययोजना न झाल्यास जनआंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

यापूर्वीही नागरिकांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी केली होती,

मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीच ठोस पावले उचललेली नाहीत.

“आता पुरे झाली शांतता! रस्ता दुरुस्त न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू,” असा इशारा नागरिकांनी दिला आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/telhara-talukayatil-tribal-rhetoric-rastache-kamatil-corrupt-corrupt-chowkashi-karoon-convicts-otherwise-the-tivr-movement-was-chased/

Related News