पातूर तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीणला अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणची मान्यता
पातूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश गावंडे यांनी सादर केलेल्या
नवनियुक्त तालुका कार्यकारिणीच्या प्रस्तावास अकोला
जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणचे अध्यक्ष अशोक अमानकर यांनी मान्यता दिली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ साहेब यांच्या
मार्गदर्शनानुसार पक्ष संघटना मजबूत करण्याच्या उद्देशाने ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.
यामध्ये मळसूर प्रसिद्धी प्रमुख म्हणून शेख अनिस शेख आमजाद यांची निवड करण्यात आली आहे .
जिल्हाध्यक्ष अशोक अमानकर यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून
ते संघटन कार्यात जोमाने व ताकदीने काम करतील
असा विश्वास व्यक्त केला तसेच भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
read also : https://ajinkyabharat.com/gadchirolit-muthi-action/