पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह

पार्डी ताड–पिंपळखुटा रस्ता सहा महिन्यांतच खड्ड्यात! मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेवर प्रश्नचिन्ह

शेलुबाजार वार्ता :⁠-

मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड ते पिंपळखुटा या मुख्यमंत्री ग्राम सडक यो जनेंतर्गत काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झालेल्या रस्त्याची अवघ्या

सहा महिने ते एक वर्षातच दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठ्या त्रासाचा सामना करावा लागत असून,

Related News

अपघाताची शक्यता वाढल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या रस्त्याचे काम सुरुवातीपासूनच अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले होते.

कामासाठी वापरण्यात आलेले साहित्य हलक्या प्रतीचे असल्यानेच रस्त्याची ही दुर्दशा झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

सध्या या रस्त्यावरून प्रवास करताना नागरिकांना जुन्या खराब रस्त्याची आठवण होत असून,

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या हेतूवरच गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

ग्रामीण भागात दर्जेदार रस्ते निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या या योजनेच्या नावाखाली निकृष्ट काम करून शासनाचा निधी वाया घालवला जात

असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यांनी संबंधित विभागाकडे या प्रकरणाची तातडीने

चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

या घटनेमुळे लोकांच्या अपेक्षांना आणि विश्वासाला तडा गेल्याचे चित्र आहे.

संबंधीत विभाग आता यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषेदेचे आमदार वसंत खंडेलवाल यांनी सुद्धा त्यांच्याकडे आलेल्या तक्रारी नुसार या कामाची गुण नियंत्रण विभाग व दक्षता

पथका कडून चौकशी करून संबंध ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव यांना पत्र लिहून केली आहे.

त्यामुळे संबंधित विभागाकडून यावर काय कारवाई केली जाते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/akhher-lekhi-receipt-upcoming-manghar/

Related News