परभणी जिल्ह्यात पाथरी सोनपेठ मार्गावरील जैतापूर वाडीजवळ एसटी बस
व दुचाकीची भीषण धडक होऊन लतिफ पठाण (56) व शेख अन्वर
(39) हे दोघे जागीच ठार झाले. दुचाकी बसच्या पुढील भागात अडकून अनेक फूट फरफटत गेली.
अपघातानंतर बस थेट शेतात घुसली. बसमधील कोणीही जखमी झाले नाही.
पोलिस निरीक्षक महेश लांडगे घटनास्थळी पोहोचले असून पुढील तपास सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/ladki-barn-yojnecha-julai-hapta-lavakrach-gathering-honar/