अकोटमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरु

अकोटमध्ये अतिक्रमण हटाव मोहीम सुरु

अकोट, प्रतिनिधी

अकोट शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक ते जिजामाता चौक या मुख्य मार्गावरील अतिक्रमण

हटविण्यासाठी नगरपालिकेने सोमवारी पासून अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली.

पहिल्याच दिवशी बसस्थानक परिसरातील अतिक्रमण हटविल्यानंतर दुसऱ्या दिवशीही ही मोहीम सुरुच राहिली.

या मोहिमेमुळे बसस्थानक मार्गाने आता मोकळा श्वास घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.

अतिक्रमणामुळे कोंडलेल्या या मार्गावरून वाहतूक आता सुरळीतपणे सुरू झाली आहे.

याआधी अतिक्रमणधारकांना पूर्वसूचना देण्यात आली होती. काहींनी स्वखुशीने अतिक्रमण काढले,

तर काहींचे दुकानांचे अतिक्रमण थेट पालिकेच्या कारवाईत हटविण्यात आले.

मोहीमेत उपअभियंता दिनेश ठेलकर, शिवाणी ठाकरे, विद्युत अभियंता अहेर,

तसेच सफाई कर्मचारी व पोलिस कर्मचारी सहभागी होते.

पालिकेने यापूर्वी सोनू चौक ते मच्छी साध पर्यंतच्या रस्त्यावर अतिक्रमण हटवून सीमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू केले होते.

शहरवासीयांनी पालिकेच्या या निर्णयाचे स्वागत केले असून, इतर ठिकाणच्याही अतिक्रमणावर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

Read Also :  https://ajinkyabharat.com/vice-president-dhankhad-yancha-rajinama-naveen-sub-presidential-process-suru/