पारस, प्रतिनिधी
सोमवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने ढगफुटीसदृश स्वरूप धारण करताच संपूर्ण पारस
गावात भीषण स्थिती निर्माण झाली आहे. गावातील रस्ते, घरं, शाळा, दुकाने पाण्याखाली गेली असून नागरिकांची झोप उडाली आहे.
गावालगतच्या शेतीमधून मोठ्या प्रमाणावर वाहून आलेल्या पाण्याने रस्ते ओसंडून वाहत आहेत.
अनेक घरांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी भरल्यामुळे अन्नधान्य, विद्युत उपकरणं, कपडे व महत्त्वाची कागदपत्रं पाण्याखाली गेली आहेत.
वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, गावात जलप्रलयाचे चित्र आहे.
प्रशासनाकडून अद्याप कोणतीही मदत पोहोचलेली नसल्याने नागरिकांनी तातडीने मदतीची मागणी केली आहे.
स्थानिक तरुणांकडून बोट व दोराच्या सहाय्याने अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
संपर्क यंत्रणा ठप्प झाल्याने बाहेरील जगाशी संपर्क तुटल्यासारखी परिस्थिती असून,
शाळा आणि सरकारी कार्यालयांचाही कामकाजावर परिणाम झाला आहे.
पावसाचा जोर अद्याप कायम असून पुढील काही तास अधिक धोकादायक ठरू शकतात,
असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे आवाहन करण्यात आले असून प्रशासनाकडून मदतीची प्रतीक्षा सुरू आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/kharip-rukti-modern-dyadiancha-wapar-soyabensh-toor-mug-udid-pike-bahli/