अकोट : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवाडा अंतर्गत मुख्यमंत्री ग्राम समृद्धी व राज अभियानांतर्गत ताजनापुर व वडगांव मेंढे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कॅप्टन सुनील डोबाळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली.
या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून विलास मेंढे, उपसरपंच विजय भेले, माजी सरपंच जगन्नाथ मेंढे, पोलीस पाटील सौ. वर्षा डोबाळे, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. रत्नमाला घुमारे, आशा सेविका सौ. उज्वला डोबाळे, ग्रामपंचायत सदस्य महिला तसेच गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण व तंटामुक्ती अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लाडक्या बहिनीही प्रमुख पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या.
या वेळी कॅप्टन सुनील डोबाळे यांनी ग्रामस्थांना संबोधित करताना सांगितले की, “देवेंद्र फडणवीस सरकार हे प्रत्येक नागरिकाला राज्याच्या विकासात व देशाच्या प्रगतीत सामील करण्यासाठी कटिबद्ध आहे. या पंधरवड्यात गावकऱ्यांच्या प्रलंबित मागण्या, पाणंद रस्ते, घरकूल, तंटा किंवा न्यायालयीन बाबींचा निपटारा करून ग्रामविकासाला गती दिली जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
तसेच गावातील महिला बचत गटाच्या अध्यक्षा, सचिव व सदस्यांचा सत्कारही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. “पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील भारताला विश्वगुरु व आर्थिक महासत्ता बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपला छोटासा का होईना, पण नक्कीच सहभाग द्यावा,” असे आवाहन कॅप्टन डोबाळे यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम मेंढे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वडगांव व ताजनापुर येथील योगेश मेंढे, विक्रम मेंढे, प्रभूदास मेंढे, ऋषीकेश मेंढे, राधेश्याम मेंढे, मंगेश डोबाळे आणि देवानंद डोबाळे यांनी विशेष परिश्रम घेतले.
read also :https://ajinkyabharat.com/ankhi-ek-vaishnavicha-bali/