पंतप्रधान मोदींच्या भाषणातील 10 महत्वाचे मुद्दे

उद्यापासून देशात नवे जीएसटी दर

नवी दिल्ली – आज मध्यरात्रीपासून देशभरात जीएसटीचे नवे दर लागू होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित करताना अर्थसंकल्पीय सुधारणा, बचत आणि स्वदेशी उत्पादन यावर भर दिला.पंतप्रधान मोदी म्हणाले की, केंद्र सरकारने जीएसटीचे चार स्लॅब असलेल्या प्रणालीतील दोन स्लॅब रद्द करून आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के स्लॅब ठेवले आहेत. त्यामुळे अनेक जीवनावश्यक वस्तू आता स्वस्त होतील. घर, टीव्ही, फ्रीज, कार, बाईक यांसह हॉटेल्स आणि प्रवासावर जीएसटी कमी होऊन सामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.मोदी यांनी बोलताना आत्मनिर्भर भारत हा नारा पुन्हा एकदा जाहीर केला. त्यांनी जनतेला आवाहन केले की, ज्या वस्तू देशात तयार करता येतात, त्या देशातच तयार कराव्यात. लघु, सूक्ष्म आणि कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा आहे आणि उत्पादनाची गुणवत्ता जागतिक स्तरावर देशाचे नाव उंचावणारी असावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषणातील 10 प्रमुख मुद्दे:

  1. जीएसटी स्लॅब आता फक्त 5% आणि 18% – जीवनावश्यक वस्तू स्वस्त होतील.

    Related News

  2. घरगुती उपकरणे, वाहनं आणि हॉटेल प्रवासावर जीएसटी कपात.

  3. नागरिकांसाठी ‘देवो भवः’ मंत्रानुसार फायदे.

  4. इन्कम टॅक्समध्ये सूट आणि जीएसटी सुधारणा – अडीच लाख कोटींची बचत.

  5. स्वदेशी उत्पादनासाठी प्रोत्साहन; देशांतर्गत उत्पादन वाढवावे.

  6. लघु, सूक्ष्म, कुटीर उद्योगांना मोठ्या अपेक्षा – रोजगार आणि उत्पादन वाढवणे.

  7. उत्पादनाची गुणवत्ता जागतिक स्तरावर भारताचे नाव उंचावेल.

  8. नागरिकांनी देशातील मेहनत घेत तयार झालेल्या वस्तू खरेदी कराव्यात.

  9. विदेशी वस्तूंवर अवलंबित्व कमी करणे – आत्मनिर्भर भारताच्या दिशेने पाऊल.

  10. सुधारणा सातत्याने होणारी प्रक्रिया – देशाच्या गरजेनुसार पुढील पायऱ्या.

पंतप्रधान मोदींनी हेही सांगितले की, जीएसटी रिफॉर्म्स आणि बचत उत्सवाच्या माध्यमातून देशातील गरीब, मध्यमवर्गीय आणि नवमध्यमवर्गीय लोकांना फायदा होईल, तसेच व्यवसाय, गुंतवणूक आणि रोजगार वाढीस चालना मिळेल.

read also : https://ajinkyabharat.com/sanjay-gaikwadanche-nivdnuk-khabat-decided-statement/

Related News