पंचायत विस्तार अधिकाऱ्याचे मार्गदर्शन

पंचायत

वाडेगाव  :कित्येक महिन्यांपासून घरकुल लाभार्थी अनुदानापासून वंचित होते. तात्कालीन ग्रामिण गृहनिर्माण अभियंता पवन पाटील यांच्या गैरव्यवहारामुळे वंचित लाभार्थ्यांना घरकुलाचा पहिलाही हप्ता अद्याप मिळालेला नाही.याबाबत उपाययोजना करण्यासाठी दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी वाडेगाव ग्रामपंचायतमध्ये पंचायत समिती बाळापूरच्या गट विकास अधिकारी बी. पी. पजई यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत नव्या ग्रामीण गृहनिर्माण अभियंता  नैना नेमाडे यांना वाडेगाव येथील घरकुल योजनेच्या अंमलबजावणीसाठी रुजू केले आहे.बैठकीत पंचायत समिती बाळापूरचे विस्तार अधिकारी (पंचायत)  दिग्विजय चव्हाण यांनी लाभार्थ्यांना लवकर अनुदान देण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी ग्रामपंचायतीचे सरपंच मंगेश तायडे, उपसरपंच राजेश्वर पळसकार तसेच गावकरी उपस्थित होते. नैना नेमाडे यांनी जिओ टॉकिंगद्वारे लाभार्थ्यांशी संवाद साधत घरकुल योजनेची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्याचे आश्वासन दिले.या बैठकीनंतर गावकऱ्यांमध्ये अनुदान वितरणाबाबत समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, पुढील काळात घरकुल लाभार्थ्यांना त्यांच्या हप्त्यांचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

read also : https://ajinkyabharat.com/tukaram-munde-%e0%a5%b2uction-modor/