दानापूर :महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान व सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत दानापूर येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या ग्रामसभेत पाणंद रस्त्यांना मान्यता देण्यात आली.
१७ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर या पहिल्या टप्प्यात “शिव पाणंद रस्ते” विषयक मोहिमेअंतर्गत रस्त्यांचे सर्वेक्षण, शेतरस्त्यांसाठी संमतीपत्र संकलन, रस्ता अदालतींचे आयोजन, सीमांकन, अतिक्रमणमुक्ती, दुतर्फा वृक्षलागवड तसेच रस्त्यांना संकेतांक देण्याचे काम करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात (२३ ते २७ सप्टेंबर) “सर्वांसाठी घरे” तर तिसऱ्या टप्प्यात (२६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर) “नाविन्यपूर्ण उपक्रम” राबवले जाणार आहेत.
याच अनुषंगाने महसूल विभागामार्फत नकाशावर असलेल्या रस्त्यांची माहिती प्रपत्र-१ मध्ये व गैरनकाशीय रस्त्यांची माहिती प्रपत्र-२ मध्ये ग्रामसभेत ठेवण्यात आली. महसूल अधिकारी ए. आर. मानकर यांनी पाणंद रस्त्यांची यादी वाचून दाखवली.
ग्रामसभेचे अध्यक्षपद सरपंच सपना वाकोडे यांनी भूषवले. यावेळी उपसरपंच सागर ढगे, ग्रामसेवक एस. जे. उईके, पोलिस पाटील संतोष माकोडे, तंटामुक्ती अध्यक्ष बब्बू खान, ग्रामपंचायत सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक, आरोग्य विभाग कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
read also :https://ajinkyabharat.com/sobatyachaya-goshti-lakshi-aka/
