पाणंद रस्त्यांना मंजुरी

दानापूर येथे महाराजस्व अभियानाअंतर्गत विशेष ग्रामसभा

दानापूर  – छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर कालावधीमध्ये “सेवा पंधरवडा” साजरा करण्याचे महाराष्ट्र शासनाचे निर्णयानुसार दानापूर येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली.

या कार्यक्रमाचा पहिला टप्पा १७ ते २२ सप्टेंबर पाणंद रस्ते मोहिमेसाठी ठेवण्यात आला होता. या टप्प्यात शिव पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण, शेत रस्त्यांचे अतिक्रमण मुक्त करणे, रस्त्यांची मोजणी व सीमांकन, दुतर्फा झाडे लावणे आणि संकेतांक क्रमांक देणे यांचा समावेश होता. दुसरा टप्पा २३ ते २७ सप्टेंबर “सर्वांसाठी घरे” या उपक्रमासाठी तर तिसरा टप्पा २६ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यासाठी आखण्यात आला आहे.

ग्रामसभेत महसूल विभागाच्या ग्राम महसूल अधिकारी ए. आर. मानकर यांनी पाणंद रस्त्यांच्या यादीचे वाचन केले. तसेच नकाशावर नसलेल्या वहिवाटीच्या रस्त्यांची माहिती प्रपत्र २ मध्ये घेऊन मान्यता मिळविण्याची प्रक्रिया पार पडली.

ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच सपना वाकोडे, उपसरपंच सागर ढगे, ग्रामसेवक एस. जे. उईके, पोलिस पाटील संतोष माकोडे, तंटामुक्ती अध्यक्ष बब्बू खान, ग्रामपंचायत सदस्य, आशा व अंगणवाडी सेविका, जि.प. शाळा मुख्याध्यापक, आरोग्य विभाग कर्मचारी, ग्राम पंचायत कर्मचारी, शेतकरी, नागरिक आणि पत्रकार उपस्थित होते.

या माध्यमातून ग्रामस्थांनी शेत रस्त्यांसाठी आवश्यक मंजुरी दिली असून, महसूल अभियानाची सुरुवात यशस्वी झाल्याचे आयोजकांनी सांगितले.]\

read also :https://ajinkyabharat.com/dhamanikhadi-gavatun-shibirasah-gramasthana-mahiti/