यवतमाळ | 8 फेब्रुवारी 2025 – प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना-पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत जलसंधारण जनजागृतीसाठी
आयोजित पाणलोट रथयात्रेचा शुभारंभ मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या हस्ते यवतमाळ येथे झाला.
यात्रेच्या माध्यमातून भावी पिढीला मृद व जलसंधारणाचे महत्त्व समजावले जाईल, तसेच दुष्काळ
व टँकरमुक्त महाराष्ट्राच्या उद्दिष्टासाठी लोकसहभाग आवश्यक असल्याचे श्री. राठोड यांनी सांगितले.
यात्रेचे वैशिष्ट्ये:
✔ 140 प्रकल्प क्षेत्र, 30 जिल्हे, 97 तालुके व 360 गावे व्यापणार
✔ 50 दिवस जनजागृती अभियान
✔ नवीन जलसंधारण कामांचे भूमिपूजन, वृक्षारोपण, गाळमुक्त धरण उपक्रम
✔ पाणलोट क्षेत्रात आभासी सहलीचा अनुभव व माती-पाणी परीक्षण
यात्रेच्या शुभारंभावेळी मृद व जलसंधारणाची सामूहिक शपथ घेण्यात आली. तसेच जिल्हा अधीक्षक
कृषि कार्यालय व आत्मा प्रकल्पांतर्गत शेतकरी गटांना 60% अनुदानावर ट्रॅक्टरचे वाटप करण्यात आले.
यात्रेनंतर हा उपक्रम वाशिम जिल्ह्यासह राज्यभरात विस्तारित केला जाणार आहे.