पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी

पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी

अमरावती : शहरातील नांदगाव पेठ औद्योगिक वसाहतीमधील एका नामांकित खासगी कंपनीला पाकिस्तानमधून

आलेल्या कॉलवरून बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या कॉलमुळे

कंपनीत तातडीने सुरक्षा वाढवण्यात आली असून उत्पादन प्रक्रिया तात्पुरती थांबवण्यात आली आहे.

Related News

नांदगाव पेठ पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेत तपास सुरू केला आहे.

काय आहे प्रकार?

कंपनीतील काही कर्मचाऱ्यांना पाकिस्तानच्या कोड असलेल्या +92 क्रमांकावरून तब्बल चार वेळा कॉल आले.

ऑडिओ कॉलद्वारे “फॅक्टरी उडवतो” अशी धमकी देण्यात आली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

धमकीबाबत मिळालेल्या माहितीवरून पोलीस आणि गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.

पोलिसांनी तातडीने कंपनी परिसरात बंदोबस्त वाढवला असून सायबर सेलने कॉल ट्रेस करण्यासाठी काम सुरू केलं आहे.

कॉलचा उगम शोधण्याचे काम सुरू

नांदगाव पेठ पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “धमकीचे गांभीर्य लक्षात घेता राज्य पातळीवरून

चौकशीचे आदेश दिले गेले आहेत.” सायबर तज्ज्ञांच्या मदतीने कॉल डिटेल्स व लोकेशन ट्रेस केले जात आहेत.

औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

या घटनेमुळे अमरावतीमधील औद्योगिक सुरक्षेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. भविष्यात अशी घटना टाळण्यासाठी

अधिक चोख सुरक्षा उपाययोजना राबवण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

Read Also :https://ajinkyabharat.com/india-pakistan-tanawavar-china-chinti-varh-vadhali/

Related News