पहलगाम हल्ल्यानंतर संताप उफाळला

पहलगाम हल्ल्यानंतर संताप उफाळला

बंगळुरू | प्रतिनिधी

पहलगाममध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात पाकिस्तानविरोधात संतापाचं वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर बंगळुरू शहरातून धक्कादायक घटना समोर आली आहे.

Related News

स्थानिक क्रिकेट सामन्यादरम्यान ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्याच्या आरोपावरून

एका तरुणाला जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली, ज्यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

घटनास्थळीच मृत्यू, आरोपींची अटक

कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्वरा यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की,

“बंगळुरूमध्ये मॉब लिंचिंगचं हे गंभीर प्रकरण आहे.

पोलिसांनी 10 ते 12 जणांना अटक केली असून, मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.”

गृहमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, “स्थानिक मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यादरम्यान त्या तरुणाने ‘पाकिस्तान झिंदाबाद’चा नारा दिला.

ते ऐकून उपस्थित काही लोक आक्रमक झाले आणि त्यांनी त्याला बेदम मारहाण केली.”

पोलिसांकडून तपास सुरू

या प्रकरणात पोलिसांनी कलम 302 (हत्या) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार असून, पोलीस मृत तरुणाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.

देशभरात संताप, सामाजिक शांततेसाठी आवाहन

पहलगाम हल्ल्याने आधीच देशभरात रोष पसरलेला असताना, अशा घटनांमुळे सामाजिक सौहार्द धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

गृहमंत्र्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून, कायदा हातात न घेण्याची सूचना दिली आहे.

Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-metot-iphone-16-thief-caught/

Related News