पानी फाउंडेशन महिला शेतकरी गटांनी श्रमदानातून केला वनराई बंधारा

पानी फाउंडेशन महिला शेतकरी गटांनी श्रमदानातून केला वनराई बंधारा

पानी फाउंडेशन सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धेत सहभागी कान्हेरी (सरप) तालुका बार्शीटाकळी जी.

अकोला येथील “मैत्री संघ महिला शेतकरी गटातील निमंत्रक व सदस्य यांनी एकत्र येऊन

सामाजिक कार्य सहभाग म्हणून आपल्या गावातील विद्रूपा नदीच्या पात्रामध्ये वनराई बंधारा तयार केला”.
पूर्व तयारी म्हणून गटांचे निमंत्रक सौ. शीला अनिल खंडारे यांच्या नेतृत्वाखाली मैत्री संघ महिला शेतकरी गटाच्या महिला एकत्र येऊन तालुका

Related News

समन्वयक संघपाल वाहुरवाघ यांचा मार्गदर्शनाखाली एकत्र मीटिंग आयोजन करण्यात आले होते.

त्या मीटिंग मध्ये जलसंधारण कामाचे महत्त्व तालुका समन्वयक यांनी महिला गटांना पटवून दिले.

कान्हेरी (सरप) हे गाव बार्शीटाकळी तालुक्यातील लोकसंख्येने मोठे

गाव असून, सन 2017 क्या वॉटर कप स्पर्धेत गावांतील तरुणांनी सक्रिय सहभाग घेतल्याने गावातील

पाणी प्रश्न सुटला.

गावाच्या शिवारात नदी खोलीकरण, शेततळे, बांधबंदिस्ती, cct, dep cct, केल्याने गावच्या शिवारातील पानी पातळीत कमालीची वाढ झाली आहे.

महिला शेतकरी गटांनी एकत्र येऊन तयार केलेल्या या वनराई बंधाऱ्याने पुन्हा एकदा वॉटर कप ची आठवण करून दिली.
यावेळी उपस्थित अनिल खंडारे, राजू भाऊ शेगोकार व पानी फाउंडेशन

तालुका समन्वयक संघपाल वाहुरवाघ व मैत्री संघ महिला शेतकरी गटाचे निमंत्रक व सदस्य उपस्थित होते.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/rey-mysterio-sr-famous-wrestler-passed-away-rey-mysterio-sr-passed-away-at-the-age-of-66/

 

Related News