गांधीग्राम: बाळशास्त्री जांभेकर यांनी ६ जानेवारी १८३२ रोजी ‘दर्पण’ हे नियतकालिक प्रकाशित करून मराठी पत्रकारितेचा पाया घातला. त्यांच्या स्मरणार्थ ६ जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून महात्मा गांधी कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व एच एस व्हि सी गांधीग्रामचे कर्तव्यनिष्ठ प्राचार्य प्रफुल्ल डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयात पत्रकार दिन साजरा करून पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून महात्मा गांधी मेमोरियल ट्रस्टचे सचिव, शाळा समितीचे अध्यक्ष तथा माजी प्राचार्य विलास झामरे, संस्थेचे उपाध्यक्ष संजय इंगळे, सहसचिव डॉ शरद काठोळे,कोषाध्यक्ष ऋषिकेशजी अढाऊ उपस्थित होते. या प्रसंगी प्रथम महात्मा गांधींच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून हार अर्पण करण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शरद वाघोलीकर, संजय माजरे, पद्माकर लांडे, विनोद वसु, कुशाल भगत, संजय इंगळे, सुनील बांगर, रवि वानखेडे, हर्षल कोल्हे इत्यादी गांधीग्राम आणि गांधीग्राम परिसरातील पत्रकारांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनावर कार्यावर आणि आदर्श पत्रकारितेच्या गुणांवर विनोद वसु आणि अध्यक्षीय भाषणातून माजी प्राचार्य विलास झामेरे यांनी प्रकाश टाकला.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य प्रफुल्ल डोंगरे यांनी, सूत्रसंचालन प्रा मोक्षादा इंगोले यांनी तर आभार प्रदर्शन देवश्री हिरुडकर यांनी केले.या कार्यक्रमाला ज्येष्ठ प्रा जगन्नाथ बरडे, सकाळ पाळीचे प्रमुख प्रा डॉ विजय चव्हाण, प्रा अतुल फोकमारे, सरिता गौर, ममता खूमकर, प्रकाश पाटणकर, अनिल मैघने, श्याम मोहोड, अजिंक्य ठोंगे इत्यादी शिक्षक तर संदीप ओहेकर, मनिषा तळोकार नारायण बावणे इत्यादी शिक्षकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात पत्रकार दिनाचे आयोजन व सत्कार

06
Jan