मुंबई –अभिनेत्री शिवानी सोनार सध्या ‘तारिणी’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नवरात्रनिमित्ताने तिने तिच्या अध्यात्मिक बाजूचा खुलासा केला आहे आणि वैयक्तिक आयुष्याबद्दलही मोकळेपणाने बोलली.
शिवानी म्हणते, “चंद्रघंटा देवी ही माझ्या स्वभावाशी अतिशय जुळणारी आहे. तिचं एक रूप धाडसी आणि रक्षण करणारी, तर दुसरं अत्यंत शांत आणि संयमी आहे. व्यावसायिक आयुष्यात मी नेहमीच धाडसी निर्णय घेतले आहेत; पण कुटुंबाची गोष्ट असते, तेव्हा मी शांत आणि समजूतदार असते.”
शिवानीने तिच्या जीवनातील बदलांबद्दल सांगितले, “पूर्वी मी थोडी चंचल होतो; पण लग्नानंतर स्थैर्य आले, दृष्टिकोन बदलला. कलाक्षेत्रात सतत बदल आणि स्पर्धा असते, पण त्यामध्ये माझ्या आतल्या शांततेने मला बळ दिलं. ‘तारिणी’ मालिकेत मला माझ्यातली ही दोन रूपं दाखवण्याची संधी मिळाली आहे – बाहेर निडर, घरात शांत आणि समजूतदार.”
नवरात्र हा स्त्रीशक्तीच्या विविध पैलूंना साजरा करणारा काळ असतो. शिवानीच्या व्यक्तिमत्त्वातल्या चंद्रघंटा देवीचे धाडसी आणि शांत रूप अनेक स्त्रियांना प्रेरणा देतं.
‘तारिणी’ ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. शिवानीसोबत अभिनेता स्वराज नागरगोजे पहिल्यांदा ॲक्शन हिरोच्या भूमिकेत दिसतो, जो मालिकेत केदारची भूमिका साकारत आहे. मालिकेला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळत आहे.
