या एका ट्रिकने तब्बल 226 किलो वजन घटवत बनली हिरोईन

क्रिस्टीना फिलिप्स

वजन वाढणे ही गंभीर समस्या बनत चालली आहे. जास्त वजन वाढण्यामागे अनहेल्दी डायट आणि खराब लाइफस्टाइल ही प्रमुख कारणे आहेत.

वजन वाढवणे जितके सोपे आहे तितकेच ते कमी करणे कठीण आहे. क्रिस्टीना फिलिप्स नावाची महिला देखील अशा लोकांपैकी एक आहे जिचे वजन खूप वाढले होते.

तिच्या वाढत्या वजनामुळे तिला प्रत्येक काम करणे कठीण जात होते. जगभरातील बहुतेक लोकांसाठी वजन कमी करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे.

वजन सहज वाढते, परंतु शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी अतिरिक्त वजन कमी करणे खूप कठीण आहे.

जर तुम्हालाही वजन कमी करायचे असेल आणि आळशीपणा किंवा इतर कोणत्याही कारणामुळे ते करतायेत नसेल, तर क्रिस्टीना फिलिप्सची वजन कमी करण्याची कहाणी तुम्हाला प्रेरणा नक्की देऊ शकते. 

क्रिस्टीना फिलिप्स आहे तरी कोण?

क्रिस्टीना ही अमेरिकेतील मिसिसिपी येथील 32 वर्षीय महिला आहे. ती एकेकाळी जगातील सर्वात लठ्ठ महिलांपैकी एक मानली जात होती.

क्रिस्टीनाला लहानपणापासूनच वजनाची समस्या होती. वयाच्या 12 व्या वर्षी तिचे वजन 136 किलो झाले होते.

22 व्या वर्षी 317 किलोपर्यंत पोचले वजन

जसजशी ती मोठी होत गेली तसतसे ततिचे वजन वाढत गेले आणि वयाच्या 22 व्या वर्षी तिचे वजन 317 किलोच्याहीवर पोहोचले.

साहजिकच इतक्या लहान वयात आणि एवढ्या वजनामुळे तिला उठणे, बसणे किंवा चालणेही कठीण झाले होते.

चालणे सुद्धा झाले मुश्कील

क्रिस्टीनाचे 317 किलो वजन असल्याने तिचे आयुष्य खूप कठीण झाले होते. तिला स्वतःच्या घरात नीट चालताही येत नव्हते.

‘My 600 lbs Life’ या टीव्ही शोमध्ये तिने आपला कठीण अनुभव सांगितला होता. काही पावले चालल्यावरही श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे तिने त्या शोमध्ये सांगितले.

ती स्वत: बाथरूममध्येही जाऊ शकत नव्हती आणि 2 वर्षे अंथरुणाला खिळून राहिली.

कसे वाढले एवढे वजन?

क्रिस्टीनाने सांगितले की, लहानपणी तिला सतत भूक लागत असे, त्यामुळे तिचे पेरेंट्स तिला जंक फूड खायला द्यायचे.

मात्र, हे खाता खाता आपल्या वाढत्या वजनाकडे तिने लक्ष दिले नाही आणि जंक फूड खाणे सुरूच ठेवले.

अखेरीस तिला स्वत:च्या वजनाची जाणीव झाली आणि तिने वजन कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला.

कसे कमी केले वजन?

डॉक्टरांनी तिला गॅस्ट्रिक बायपास सर्जरी (पोटाचा एक भाग कमी करण्यासाठी ऑपरेशन) करण्याचा सल्ला दिला, पण आधी थोडे वजन कमी करणे आवश्यक होते.

यानंतर क्रिस्टीनाने हेल्दी डाएट घ्यायला सुरुवात केली आणि वजन कमी करण्यात यश मिळवले. त्यानंतर तिच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि हळूहळू तिचे वजन कमी होऊ लागले.

सर्जरीमुळे झाली कमाल

क्रिस्टीना फिलिप्सचे वजन आता 91 किलो पर्यंत कमी झाले आह. क्रिस्टीना तिच्या वजन कमी करण्याच्या यशाबद्दल खूप आनंदी आहे.

पण तिने केलेली गॅस्ट्रिक बायपास सर्जरी म्हणजे काय? तर या वैद्यकीय प्रक्रियेत पोटाजवळ एक थैली ठेवली जाते, जी पाईपद्वारे लहान आतड्याला जोडली जाते.

जेव्हा तुम्ही खाता तेव्हा अन्न थेट पोटात जाण्याऐवजी या पाईपमधून लहान आतड्यात जाते.

मग पोटातील पाचक एन्झाईम्स देखील त्या थैलीमध्ये येतात ज्यामुळे अन्न पचण्यास सुरवात होते. यामुळे वजन झपाट्याने कमी होऊ लागते.