Opposition Leader : भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार का? अधिवेशनाचे काही दिवस शिल्लक असताना काय निर्णय होणार?

Opposition Leader : भास्कर जाधवांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार का? अधिवेशनाचे काही दिवस शिल्लक असताना काय निर्णय होणार?

Opposition Leader : ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे.

मात्र अजूनही त्यावर कुठलाही निर्णय विधानसभा अध्यक्षांकडून घेण्यात आलेला नाही.

राज्यातील विधानसभा विरोधी पक्ष नेत्याचं काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं होतं. अधिवेशनाचे काहीच दिवस शिल्लक

Related News

असताना महाविकास आघाडीतील ठाकरे यांच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्ष नेते पदासाठी भास्कर जाधव यांचा नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे

मात्र अजूनही त्यावर कोणता निर्णय झालेला नाही. विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचे नेमके काय होणार? या अधिवेशनाचे शेवटचे काही दिवस उरले आहेत

असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरेंच्या शिवसेनेने विधानसभा विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर

जाधव यांचं नाव विधानसभा अध्यक्षांकडे दिला आहे. मात्र अजूनही त्यावर कुठलाही निर्णय विधानसभा अध्यक्षांकडून घेण्यात आलेला नाही.

पुढील 5 ते 6 दिवसात निर्णय झाला नाही तर सलग हिवाळी अधिवेशनानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशन असे दोन अधिवेशन विधानसभा विरोधी पक्षनेते पदाविना जाणार आहेत.

विरोधकांकडून विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात विरोधी पक्षनेते पदाचा चेंडू टाकला आहे. महाविकास आघाडीकडून विरोधी

पक्षनेते पदासाठीची पूर्ण प्रक्रिया पार पाडली आहे. यावर लवकर निर्णय विधानसभा अध्यक्ष घ्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली आहे.

या अधिवेशनात विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार का?

पुरेसं संख्याबळ नसलेल्या महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी

पक्षनेते पद मिळवण्या एवढ्या जागाही जिंकता आलेल्या नाहीत. जर विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तरच विरोधकांना हे पद मिळू शकतं अशा चर्चा सुरू होत्या.

या अधिवेशनात तरी विधानसभा विरोधी पक्षनेते पद मिळणार का? असा सवाल उपस्थित होत

असताना विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीसाठी कोणतेही खास तरतूद नसल्याचं विधिमंडळ सचिवांनी ठाकरे गटाच्या भास्कर जाधव यांना उत्तर दिलंय.

विरोधी पक्ष नेता निवडीचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना असल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

त्यामुळे आता तरी विरोधी पक्षनेत्याची निवड होणार की हे अधिवेश देखील विरोधी पक्षनेत्याशिवाय पूर्ण होणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Related News