मुंबई :
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर
(PoK) मधील ९ दहशतवादी तळांवर प्रतिहल्ला करत ‘ऑपरेशन सिंदूर’ यशस्वीपणे पार पाडले.
Related News
लोहारा पोलिसांच्या कारवाईत दोन पिस्तुलांसह दोन हिस्ट्रीशीटर अटकेत
अकोला शहरात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस;
भारत-पाकिस्तान दरम्यान तात्काळ शस्त्रसंधी लागू; संध्याकाळी ५ वाजल्यापासून गोळीबार थांबणार
सर्व यंत्रणांनी सजग राहून सातत्यपूर्ण समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी अजित कुंभार
मिशन सिंदूरमध्ये 300 जवान सरहद्दीवर
भारत-पाकिस्तान सीझफायरवर सहमत? ट्रम्प यांचा मोठा दावा,
भारताचा दहशतवादाविरुद्ध ऐतिहासिक निर्णय;
वंचित बहुजन युवक आघाडीच्या वतीने रक्तदान शिबिर
ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात; ‘हुकूमत तर सोडा
भारताचा पहिला हायड्रोजन फ्यूल सेल ट्रक अदानी इंटरप्रायजेसकडून लाँच;
पाकिस्तानी कॉलवरून अमरावतीतील कंपनीला बॉम्बने उडवण्याची धमकी
भारत-पाकिस्तान तणावावर चीनची चिंता वाढली ;
या कारवाईच्या काही तासांतच बॉलिवूडमधील अनेक निर्माते ‘ऑपरेशन सिंदूर’ हे नाव चित्रपटासाठी
रजिस्टर करण्यासाठी स्पर्धा करू लागले. या टायटलवर आधारीत चित्रपटाची
अधिकृत घोषणा आता करण्यात आली असून त्यासोबतच वादही उफाळले आहेत.
विवादित घोषणा आणि माफी
ज्येष्ठ निर्माते जॅकी भगनानी यांचे चुलत भाऊ विक्की भगनानी आणि निक्की भगनानी यांनी
‘ऑपरेशन सिंदूर’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट निक्की विक्की भगनानी फिल्म्स आणि
द कंटेंट इंजिनिअर प्रॉडक्शन्स या बॅनरखाली तयार होणार आहे.
दिग्दर्शनाची धुरा नितीन कुमार गुप्ता आणि उत्तम माहेश्वरी सांभाळणार आहेत.
या घोषणेसोबतच प्रसिद्ध फोटोग्राफर विरल भयानीने एक एआय जनरेटेड पोस्टर इन्स्टाग्रामवर शेअर केले,
ज्यामध्ये एक महिला सैनिक बंदूक हातात घेऊन उभी आहे. पोस्टरवर “भारत माता की जय – ऑपरेशन सिंदूर” असे लिहिले आहे.
मात्र या घोषणेनंतर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला गेला.
सामाजिक प्रतिक्रिया आणि तणावाचा प्रश्न
देशात भारत-पाकिस्तानमधील तणावपूर्ण वातावरण असताना अशा संवेदनशील विषयावर तातडीने
चित्रपटाची घोषणा करणे गैर असल्याचे अनेकांचे मत आहे. काही जणांनी याला “मेकर्सना केवळ अटेंशन पाहिजे” अशी टीका केली.
विरोधानंतर निर्मात्यांनी माफी मागितली असून, जनभावनांचा आदर करत स्क्रिप्ट
आणि वेळेबाबत फेरविचार केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.
Read Also : https://ajinkyabharat.com/akola-shaharat-vadi-vyasah-viger-paus/