दिनांक ३ जानेवारी, शनिवार रोजी माता सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून बुद्ध विहार समन्वय महासंघ, अकोला यांच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुउद्देशीय उत्कर्ष प्रतिष्ठान, खडकी, अकोला येथे महिलांची भव्य धम्मपरिषद पार पडली. या कार्यक्रमाचा उद्देश स्त्रीशक्ती, सामाजिक समता, धम्मसंस्कार आणि सामाजिक बांधिलकी याबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. उपस्थितांना प्रेरणा देणाऱ्या या कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत शिस्तबद्ध आणि प्रेरणादायी होते.
धम्मपरिषदेत अकोला, बुलढाणा, वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील उपासक-उपासिका संघटनांचे सक्रिय योगदान विशेष उल्लेखनीय ठरले. श्रमदान, वेळेचे दान व आर्थिक दान या तिन्ही माध्यमातून सर्वांनी मिळून कार्यक्रमाला ठोस पाठबळ दिले. या सामूहिक प्रयत्नांमुळेच परिषद अपेक्षित उंचीवर पोहोचली. बुद्ध विहार समन्वय महासंघाने या सहभागाबद्दल सर्वांना कृतज्ञता व्यक्त केली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. मुकुंदरावजी भारसाकळे, समाजसेवक गजानन हरणे, इंजि. सुभाषरावजी तायडे, देवराज अहिर, प्रल्हादराव इंगोले, सावजी साहेब, रमा घरडे, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झिंगुबाई बोलके, सुनिताताई इंगळे, लताताई सुखदिवे, सुरेशभाऊ इंगळे गुरुजी, मोहनरावजी जामनिक, सुरेंद्रजी घरडे, रमाताई घरडे, पुष्पाताई पळसपगार, सुमनताई तिरपुडे, समाधानची जगताप, शोभा जोंधळे, येथील सरपंच बाबुरावजी इंगळे, भगवानजी खंडारे, भीमराव गोपनारायण यांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
Related News
धम्मपरिषदेच्या कार्यक्रमात बुदविहार या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ५० बुद्ध विहारांना धम्मदानदाता भवसुदंर वाणखडे यांनी १०० पुस्तके वाटप केली. धम्मधारा येथील महाप्रज्ञापती महिला संघ, न्यू भीमनगर (अकोला), कावसा येथील रमाबाई महिला संघ व उमरी येथील महिला संघ यांनी वेळेत वेळ काढून उपस्थित राहून महिलांच्या धम्मप्रबोधनात सक्रिय सहभाग घेतला.
यासोबतच भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष गोरखनाथजी वानखडे, समता सैनिक दल, अकोला, डॉ. जगदीश वानखडे, डॉ. अजयजी सुरवाडे, एस.एस. मेश्राम, रवी जवजाळ, सदिप इंगळे यांसारख्या मान्यवरांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
माता सावित्रीच्या विचारांना समर्पित, स्त्रीशिक्षण, आत्मसन्मान आणि धम्मसंस्कार यांचा प्रचार करणारी ही परिषद सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली. या परिषदेला १००० हून अधिक महिलांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमाचे संचालक साहेबराव मोरडे, प्रमुख वक्ते धम्मबोधी डोंगरे, नानाभाऊ किरतकार, प्रास्ताविक वसंतरावजी अवचार, स्वागताध्यक्ष मोतीरामजी गायकवाड, पोलीस निरीक्षक रवीभाऊ दामोदर व प्रेमकुमार शेंडे आदी मंचावर उपस्थित होते. आभार प्रदर्शन मनोर वानखडे यांनी केले.
सकाळी ११ वाजता सुरू झालेली ही महिला धम्मपरिषद सायंकाळी ५ वाजेपर्यंत पार पडली. कार्यक्रमात विविध सामाजिक व स्त्रीविषयक मुद्द्यांवर तज्ज्ञ लोकांनी मार्गदर्शन केले, तसेच पुढील ॲक्शन प्लॅन तयार करून महिला सक्षमीकरण आणि सामाजिक सुधारणा सुनिश्चित करण्याचे नियोजन करण्यात आले.
ही परिषद स्त्रीशक्तीला प्रोत्साहन देणारी, समाजात समता आणि नैतिक मूल्यांची जाणीव निर्माण करणारी ठरली असून, अकोला परिसरातील महिलांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरली.
read also : https://ajinkyabharat.com/10-shocking-facts-kidney-valley-nepal-where-almost-everyone-has-only-one-kidney/
