ओला दुष्काळ आणि कर्जमाफीसाठी संभाजी ब्रिगेडचा भव्य मोर्चा”
मेहकर, २९ सप्टेंबर २०२५: मेहकर उपविभागीय कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष पांडुरंग पाटील यांच्या नेतृत्वाखाली तालुका आणि जिल्हाभरातील हजारो शेतकऱ्यांनी भव्य मोर्चा काढून सरकारच्या धोरणांचा निषेध केला.शेतकरी आंदोलनाचे मुख्य मुद्दे होते:ओला दुष्काळामुळे होणारे नुकसान,विना अटी-शर्ती सातबारा कोरा,हेक्टरी किमान पन्नास हजार रुपये मदत,प्रलंबीत पिकविमे व रखडलेले अनुदान,शेतकऱ्यांना सोलार प्लेटसाठी विलंब करणाऱ्या कंपन्यांविरुद्ध कारवाई,मोर्चात उपस्थित शेतकऱ्यांनी प्रशासन व सरकारवर तीव्र रोष व्यक्त केला. काही काळ महामार्गावर वाहतूक थांबवली गेली, ढोलकी आणि ताशा वाजवून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न केला गेला. महिला शेतकऱ्यांनीही सहभागी होऊन डोळ्यांतून अश्रू वाहवत आपल्या भावना व्यक्त केल्या.मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी लिहिलेले निवेदन उपविभागीय अधिकारी रविंद्र जोगी यांनी रस्त्यावर येऊन स्वीकारले. तालुका व जिल्हापदाधिकारी, जिल्हाकार्याध्यक्ष आणि संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी हजारो शेतकऱ्यांसह उपस्थित होते.पांडुरंग पाटील म्हणाले, “शेतकरी आज मरत आहेत, तरीही सरकार फक्त साडेआठ हजार रुपये मदत आणि दोन हेक्टर मर्यादा लावत आहे.
read also : https://ajinkyabharat.com/i-gharararsavatra-bapacacha-5-years-old-chimukaliwar-inhuman-atrocities/