महसूल सप्ताह अंतर्गत अधिकारी व कर्मचारी फिल्डवर

महसूल सप्ताह अंतर्गत अधिकारी व कर्मचारी फिल्डवर

विविध महसूल मंडळांमध्ये पांदण रस्ते मोजणी सह करण्यात आले दुतर्फा वृक्षारोपण.

मानोरा ता प्र तहसीलदार डॉ.संतोष येवलीकर यांच्या नेतृत्वात एक ऑगस्ट ते सात ऑगस्ट या

आठवड्यात महसूल सप्ताह अंतर्गत विविध गावातील शेतकरी, गावकरी यांच्याशी संबंधित लोकाभिमुख कामाचा

धडाका सुरू असून या कामी महसूल,कृषी, पंचायत आदी विभागाचे अधिकारी कर्मचारी सुद्धा धावपळ करताना दिसत आहेत.

तालुक्यातील सहाही महसूल मंडळातील शेतकऱ्यांना शेत शिवारात जाण्यासाठी व असे तसे कृषी पिके घरापर्यंत आणण्यासाठी गरजेचे

असलेले पांदण रस्ते शिवाड्या यांचे विवादास्पद दावे सम़पचाराने सोडवणे केला प्राधान्यक्रम देण्यात आले.

महसूल सप्ताह अंतर्गत मौजे सिंगडोह ते कोठारी पांदण रस्त्याची मोजणी करतेवेळी स्वतः तहसीलदार डॉ. येवलीकर जातीने हजर होते.

सिंगडोह कोठारी पांधन रस्त्याच्या दोन्ही बाजूला तहसीलदारांच्या उपस्थितीत वृक्ष लागवड सुद्धा करण्यात आली.

मोहगव्हाण ते जामदरा पांदन रस्ता मोजणी व दुसरपा वृक्ष लागवड नायब तहसीलदार अस्टूरे

यांच्या हस्ते तथा विभागातील इतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

रुद्राळा ते जामदरा पांदन रस्त्याची मोजणी व वृक्ष लागवड सुद्धा महसूल सप्ताह अंतर्गत अधिकारी कर्मचारी

यांच्या उपस्थितीत करण्यात आली. सिंगडोह, रुद्राळा,जामदरा, मोहगव्हाण, दापुरा या गावातील सरपंच,

उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व स्थानिक नागरिकांनी सहभाग नोंदविला.

Read Also : https://ajinkyabharat.com/kamargaon-madhe-jai-bholenath-kavad-mandal-and-vishwa-hindu-parishad-bajrang-dal-kadun-kavad-yatre/