आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना ३०० आपदा मित्रांना साहित्याचे वाटप..

आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यांना ३०० आपदा मित्रांना साहित्याचे वाटप

गेल्या काही दिवसापासून राज्यभरात पावसाचा जोर वाढला असून नदीनाले ओसांडून वाहू लागले आहेत.

दरम्यान यंदाच्या पावसाळ्यात अकोलेकरांचे आपत्तीपासून रक्षण व्हाव याकरता अकोल्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयांच्या

आपत्ती व्यवस्थापन मार्फत मे महिन्यात आणि जुलै मध्ये आपदामित्र म्हणून ३०० जणांची निवड करण्यात आली होती.

त्यांना पाणी बचाव, बोट चालवणे आणि इतर समस्यांना तोंड देणे अशा विविध विभागांमध्ये बचाव कार्य शिकवण्यात आले होते.

यामध्ये पोलीस पाटील, ग्रामसेवक, तलाठी यासह गावातील पट्टीचे पोहणारे यांचं बचाव प्रशिक्षण पूर्ण झालेल्यांना यामध्ये पुढील

काम करण्यासाठी आज शासनाकडून बचाव किट देण्यात आले . यांमध्ये लाईट जॅकेट, हेल्मेट, सेफ्टी गॉगल यासह इतर साहित्याच वितरण करण्यात आलं.

Byte : संदीप साबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अकोला जिल्हा

Read Also : https://ajinkyabharat.com/wp-admin/post.php?post=16256&action=edit&classic-editor__forget