ओबीसी मधील विविध समाजाचे नेत्यांनी आणि संघटनानी दिल्या भेटी
अकोला : मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हैद्राबाद गेझिटियर लागू करून मराठा समाजाला ओबीसी समाज आरक्षणात घुसखोरी सुरु आहे आणि हा प्रकार ओबीसी समाजावर अन्याय करणारा आहे. याला थांबवीण्यासाठी लोकशाही मार्गाने ओबीसी समाजाच्या वतीने सोमवार 15 सप्टेंबरपासुन जनार्दन हिरळकर, शंकर बापूरावं पारेकर, पुष्पाताई गुलवाडे, राजेश माणिकराव ढोमणे, ऍड. भाऊसाहेब विठ्ठलराव मेडशिकर या पाच प्रतिनिधिनी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले असून आज दुसऱ्या दिवशी अनेक संघटना यांनी पाठींबा आणि नेत्यांनी भेटी देत आमरणाला समर्थन दिले.ओबीसी समाजाला धैर्य धरण्याचे आणि कायदेशीर मार्गाने लढा देण्यासाठी आणि समस्येचे निराकरण करण्यासाठी आमरण उपोषण सुरु करण्यात आले आहे. ह्यासाठी आज सर्वपक्षीय ओबीसी राजकिय नेते आणि संघटनानी लेखी पत्र देऊन आपला पाठींबा दिला आहे यामध्ये रामदास तायडे, रमेश वानखडे, राम भारती, विवेक बिजवे,ग मा पुणकर, विजय ओहकपुरे, अमोल सातपुते, वैभव कवठेकर, सुधाकर गाडगे, अतुल नवसे, उमेश खोडे, ज्ञानेश्वर बोदडे,विलास करवते, गणेश कोंडीकर, सौ. प्रणिता समरीतकर, नंदाताई बिल्लेवर, माधुरी घनोकार, रमेश इंगळे, संतोष सरोदे, गणेश सुरोशे, मधुकर सोनारगण, नंदू बोपुलवार, जगन्नाथ रोठे, यांचा समावेश आहे.
या जातींचे आहे आंदोलनास समर्थन
ओतारी, डोबारी, छप्परबंद मुस्लीम, माकडवाले, लभाणी, वेरड, रामोशी, मुस्लीम शाहा, मुस्लीम मदारी, मन्नेवार, बागवान व ओबीसी मध्ये समाविकोल्हाटी, नंदीवाले, वासुदेव, बहुरूपी, गारपगारी, जवेरी, कासार, भांड, छप्परभांड, मानभाव, परदेशी, लोथी आगरी, गुजर, भुते, मैराळ, वैद्, बाव्छप्परबंद, इराणी, ठाकूर, चितारी, काशीकापडी, गुरव, झिंगाभोई, मसनजोगी, फुलारी, गोपाळ, शिकलगार, वडार, राजपूत, भामटा, बेरड, गारू्डी,गोसावी, यादव, गवळी, रंगारी, बारी, लोणारी, लोहार, साळी, कलाल, भराडी, चित्रकथी, सुतार, गोवारी, हलया, नाथजागी, जोगी, मदारी, कैकार्डी,कुणबी, माळी, धनगर, तेली, वंजारी, बंजारा, कुंभार, धोबी, न्हावी, भोई, बेलदार, सोनार, कोळी, कोष्टी, शिंपी, भावसार, गोंधळी समाजाने आपला पाठींबा दर्शविला आहे. या आंदोलनाचा प्रचार करावा व लाखोच्या संख्येने या आंदोलनात सहभागी ब्हावे ! असे आवाहन समस्न ओ.बी.सी. समाज अकोला जिल्हा यांनी केले आहे.
read also : https://ajinkyabharat.com/37-km-27-stations-mumbaikaransathi-motha-surprise/