विधानसभेत ओबीसी बहुजन पार्टी 200 हून अधिक जागा लढणार

 टी. पी. मुंडेंनी केली घोषणा

राज्यात विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मराठा-ओबीसी आरक्षणाचा प्रश्न

तापल्याचे दिसून येत असताना नुकतेच प्रकाश आंबेडकरांनी केलेल्या वक्तव्यानंतर

Related News

आगामी येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर

ओबीसी बहुजन पार्टी कामाला लागली आहे.

ओबीसी बहुजन पार्टी 200हून अधिक जागा लढणार तर बीड जिल्ह्यातील

सहाही विधानसभा जागा ताकतीने लढणार असल्याचं ओबीसींचे नेते

टी. पी मुंडे म्हणाले आहेत.आज बीडमध्ये प्राध्यापक टी.पी मुंडे

यांच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत टी.पी मुंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

दरम्यान, आज वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी

ओबीसींच्या आरक्षणाला 100 टक्के धाेका असून एकाही कुणबी मराठा उमेदवाराला

विधानसभेत मत न देण्याचे वक्तव्य केल्यानंतर आता ओबीसी नेत्यांकडून

विधानसभेसाठी मोर्चेबांधणी होताना दिसत आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीत दोनशेहून अधिक जागा ओबीसी बहुजन पार्टी

लढणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. तर याच अनुषंगाने राज्यभरात बैठका सुरू असून

प्रत्येक जिल्ह्यात बैठका सुरू आहेत. बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा लढणार आहोत.

जरांगे पाटील किती जागा लढणार हा त्यांचा प्रश्न आहे.

आमचा नाही आता ओबीसी समाज पूर्णतः जागा झालाय.

Read also: https://ajinkyabharat.com/allu-arjuns-helping-hand-for-landslide-victims-in-kerala/

Related News