उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याने देशातील 30 अधिकाऱ्यांना
फाशीची शिक्षा सुनावली आहे. उत्तर कोरियातील पुराचा सामना करण्यात
अपयशी ठरल्याबद्दल या अधिकाऱ्यांना शिक्षा देण्यात आली आहे.
Related News
चेहऱ्याचा रंग उजळण्यासाठी सोपे घरगुती उपाय….
कांगो नदीत भीषण बोट दुर्घटना;
फ्लोरिडा विमानतळावर थरारक क्षण;
झारखंडच्या रांचीमध्ये पहिल्यांदाच एअर शो;
दिल्लीतील मुस्तफाबादमध्ये इमारत कोसळली;
पुन्हा ‘ठाकरे विराजमान’? राज ठाकरे यांचा युती प्रस्ताव, उद्धव ठाकरे यांचा सकारात्मक प्रतिसाद!
तापमान वाढीमुळे पोल्ट्री व्यवसायाला फटका;
माकडांच्या टोळक्यांमध्ये भीषण झटापट; रस्त्यावरच दिसला ‘गँगवॉर’सारखा थरार
पत्नीच्या मारहाणीची तक्रार करताच नवऱ्यावरच 307 कलमांतर्गत गुन्हा
पत्नीने आइब्रो सेट केल्याच्या रागातून पतीने केली चोटी कापण्याची धक्कादायक घटना
हरिद्वार-देहरादून महामार्गावर महिलेचा गोंधळ,…
अकोल्यात गुडफ्रायडे भक्तीभावाने साजरा
खरं तर, मुसळधार पावसामुळे जुलैमध्ये उत्तर कोरियामध्ये भूस्खलन आणि
पूर आला होता. या काळात सुमारे 1 हजार लोकांचा मृत्यू झाला होता.
तर 4 हजार घरे उद्ध्वस्त झाली. मात्र, किम जोंग यांनी हे आकडे फेटाळून लावले.
त्यांनी स्वत: पूरग्रस्त भागाचा दौरा केला. ज्या अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा
सुनावण्यात आली ते भ्रष्टाचार आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी दोषी आढळले.
आपत्तीदरम्यान झालेल्या नुकसान आणि मृत्यूसाठी त्यांना जबाबदार धरण्यात आले आहे.
उत्तर कोरियाचे सरकारी मीडिया केसीएनएने म्हटले आहे की, किम जोंग यांनी
अधिकाऱ्यांना कठोर शिक्षेचे आदेश दिले आहेत. मात्र हे अधिकारी कोण आहेत
याची माहिती समोर आलेली नाही. हुकूमशहा किम जोंग यांनी म्हटले आहे की,
पूरग्रस्त भागातील पुनर्बांधणीसाठी 2-3 महिने लागू शकतात. त्यांनी देशातील
3 प्रांतांना विशेष आपत्ती आपत्कालीन क्षेत्र म्हणून घोषित केले आहे.
कोरोना महामारीनंतर उत्तर कोरियामध्ये सार्वजनिक मृत्यूदंडाच्या प्रकरणांमध्ये वाढ
झाली आहे. कोरोनापूर्वी, उत्तर कोरियामध्ये एका वर्षात 10 सार्वजनिक मृत्यूदंडाची
प्रकरणे होती. मात्र आता दरवर्षी सुमारे 100 जणांना ही शिक्षा दिली जात आहे.
Read also: https://ajinkyabharat.com/ajit-pawar-group-ready-to-contest-elections-in-jammu-and-kashmir/