“नूर वाला आला… पातूरच्या गल्लीबोळा सजले ईद मिलादुन्नबीच्या झांक्यांनी”

ईद

पातूर – संपूर्ण जगभर साजरी होत असलेल्या ईद मिलादुन्नबी (12 रबी उल अव्वल) निमित्ताने पातूर शहरातही गल्ली-मोहल्ल्यांमध्ये सजावट सप्ताह आयोजित करण्यात आला. देवडी मैदान, किल्ला बाग आणि मुझावरपूरा येथे रोषणाई आणि आकर्षक झांक्यांची झळाळी पाहायला मिळाली.विशेष म्हणजे किल्ला बाग येथे स्थानिक तरुण कारागिरांनी 15 दिवस मेहनत घेऊन झांक्या तयार केल्या, ज्या सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. झांक्यांमध्ये “चांदाचे दोन तुकडे होणे”, “गुंबद-ए-खिजरा वर रहमतची बरसात”, लोखंडी रॉडमधून हजरत अलींच्या नावाचे दृश्य तसेच कागद व कार्डबोर्डच्या सहाय्याने मोहम्मद पैगंबर(स. अ) यांच्या काळातील मशिदी व नूहच्या नौकेचे मॉडेल्स सादर केले गेले.सजावट आणि झांक्यांमध्ये मोहम्मद राजा, मोहम्मद तौसीफ, मोहम्मद जावेद, मोहम्मद तौफीक खतीब, इरशाद हुसैन यांसह अनेक तरुण आणि मुलांचे मोठे योगदान होते.ईस्लामिक धर्मगुरू मोहम्मदी इम्तियाजउद्दीन रजवी, मुफ्ती आरिफ राजा अजहरी, सैयद नसीबुल कादरी, मोहम्मद आरिफ रजा यांनी झांक्यांचे परीक्षण केले आणि किल्ला बागने प्रथम क्रमांक पटकावला.

READ ALSO : https://ajinkyabharat.com/70-year-old-anokhi-mahilecha-deadde-sapadla/