नॉन-स्टिक कुकवेअर घरगुती स्वयंपाकात लोकप्रिय आहे कारण यात अन्न चिकटत नाही, धुण्यास सोपं आहे आणि कमी तेलात शिजवता येतं. परंतु इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या तज्ज्ञांच्या मते, या भांड्यांमध्ये उच्च तापमानावर स्वयंपाक केल्यास टेफ्लॉनमधील रसायन अन्नात मिसळतात, जे वंध्यत्व, हृदयाचे आजार आणि लोहाची कमतरता यासारख्या गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकतात.
तज्ज्ञांचे सल्ले:
नेहमी प्रतिष्ठित ब्रँडचे नॉन-स्टिक भांडे वापरा.
लाकडी किंवा सिलिकॉन चमचे वापरावेत, स्टीलच्या चमच्याने लेप निघून जाऊ शकतो.
जर भांड्याचा लेप झिजला असेल, तर तुरंत नवीन भांडे खरेदी करा.
जास्त तापमानावर स्वयंपाक टाळा, विशेषतः जास्त वेळ गरम ठेवणे धोकादायक.
घरगुती स्वयंपाकासाठी सुरक्षितता आणि आरोग्य यासाठी या सूचना पाळणे आवश्यक आहे.
read also :https://ajinkyabharat.com/team-indianat-2-changed/
