अकोला, दि. 15: पंजाबमधील खनौरी बॉर्डर येथे मागील ११ महिन्यांपासून शेतकरी हमीभावाच्या कायद्याच्या
मागणीसाठी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल करत असून,
त्यांचे आमरण उपोषण गेल्या ५१ दिवसांपासून सुरू आहे. या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अकोल्यातील
Related News
शेतकरी जागर मंचच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या:
- शेतमाल हमीभाव कायदा लागू करावा.
- सरसकट कर्जमाफी द्यावी.
- शेतमालासाठी योग्य हमीभाव निश्चित करावा:
- सोयाबीन: ₹6,000 प्रति क्विंटल
- हरभरा: ₹8,000 प्रति क्विंटल
- कापूस: ₹10,000 प्रति क्विंटल
- तूर: ₹12,000 प्रति क्विंटल
- स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी त्वरित लागू कराव्यात.
- पिक कर्जासाठी सिबील अट रद्द करावी.
- कर्ज परतफेडीचा कालावधी १२ महिने निश्चित करावा.
- प्रत्येक हंगामासाठी (रब्बी, खरीप) प्रति एकर ₹40,000 अनुदान द्यावे.
- कृषी साहित्यावरून जीएसटी (GST) रद्द करावी.
शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी
आपल्या मागण्यांसाठी आवाज उठवला आणि शेतकरी हिताच्या धोरणांवर सरकारने लक्ष केंद्रीत करावे, अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनाला शेतकऱ्यांसह विविध संघटनांचा मोठा पाठिंबा मिळाला.
इतर महत्त्वाच्या बातम्या Read Also : https://ajinkyabharat.com/on-the-occasion-of-makar-sankranti-the-women-of-mhatla/

