निवडणूक आयोग लोकशाहीचा खून करतोय” – जितेंद्र आव्हाड

निवडणूक आयोग लोकशाहीचा खून करतोय” - जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाडांचा अकोल्यात संताप – “राहुल गांधींचं मुद्दा योग्य, निवडणूक आयोग लोकशाहीचा खून करतोय”

अकोला – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या *“वोट चोरी”*च्या मुद्द्याचं आम्ही स्वागत करतो,

असं स्पष्ट वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी अकोल्यात केलं.

निवडणूक आयोग लोकशाहीचा खून करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी यावेळी केला.

१५ ऑगस्टला मांसावर बंदी आणण्याच्या सरकारच्या निर्णयावरही त्यांनी जोरदार टीका केली. “देश आधी वाटला, भाषा वाटली… आता खाद्यपदार्थही वाटणार का?

आम्ही हिंदू आहोत पण सनातनी नाही,” अशा शब्दांत आव्हाडांनी सरकारवर हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच सुरू करणार असलेल्या योजनांवरही आव्हाडांनी उपरोधिक टीका केली.

“लाडका नातू, लाडकी सासू, लाडका सासरा अशा योजना सरकारने आणाव्यात,” असा टोला त्यांनी लगावला.

मंडळ यात्रेच्या निमित्ताने अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आंदोलकांवर “सिने स्टाईल लाथ” मारणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा निषेध करताना, “त्याला थेट बॉलिवूडमध्ये फायटर म्हणून घ्यावं,” असा उपरोधिक सल्लाही आव्हाडांनी दिला.

आव्हाडांच्या या विधानांमुळे अकोल्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

Read also : https://ajinkyabharat.com/gautami-patil-maanadhan-acoon-chahuthanahi-basatoy-push/