नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू ठरणार किंगमेकर ?

किंगमेकर

काँग्रेसच्या दिल्लीत मोठ्या हालचाली

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या कलांनुसार भाजप प्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडी आघाडीमध्ये चुरशीची लढत होताना दिसत आहे. भाजपा 298 जागांवर आघाडीवर असली तरी बहुमताचा आकडा गाठताना दोघांचीही दमछाक होणार आहे. अशातच भाजपाच्य साथीला असलेले व कोणत्याही क्षणी या गोटातून त्या गोटात उड्या मारू शकणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमा आणि आंध्र प्रदेशचे चंद्राबाबु नायडू किंगमेकर ठरण्याची शक्यता आहे.
यामुळे या दोघांचा संपर्क करण्याच्या हालचाली काँग्रेसमध्ये सुरू झाल्या असून या दोघांना चांगली ऑफर आली तर ते इंडिया आघाडीसोबत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सध्या नायडूंचा तेलगू देसम पक्ष 16 जागांवर आघाडीवर आहे. तर नितीश कुमार यांचा पक्ष 12 जागांवर आघाडीवर आहे. या दोघांच्या जागा 28 ते 30 च्या आसपास आहेत. जर भाजपाला काठावर बहुमत मिळाले तर हे दोघेच किंगमेकर ठरणार आहेत. अशात ते काँग्रेससोबतही जाऊ शकतात, अशी शक्यता व्यक्त केल्या जात अहे. गेल्या काही काळापासून नितीशकुमार हे एनडीएच्या प्रचारात दिसले नाहीत. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. काल नितीशकुमारांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. सर्व प्रमुख पक्षांची राजकीय रणनीती वेगाने बदलू लागली आहे. सत्ता टिकवण्यासाठी भाजपला गुंतागुंतीच्या वाटाघाटी आणि धोरणात्मक आघाड्या बांधण्याची गरज आहे. तर काँग्रेसला या दोघांना फोडले तर सत्तेत जाण्याची संधी खुणावत आहे. यामुळे या दोघांशी काँग्रेस नेत्यांकडून संपर्क करण्यात येत असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

महाराष्ट्रात उलथापालथ
देशभरात सध्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असून महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघातील 30 मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडी पुढे असून 17 जागांवर महायुतीने आघाडी घेण्यात यश मिळवले आहे. तर एका जागेवर अपक्ष उमेदवाराने मताधिक्य घेतले आहे. महाराष्ट्रात काही मतदारसंघांमध्ये मोठ्या उलथापालथीचे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Related News

Related News