राजुरा घाटे येथे आढळली दुर्मीळ पांढरी चिमणी.
मुर्तिजापूर : मुर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाटे येथील जि.प. उच्च प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र
शिक्षक श्री. मनोज लेखनार हे गेल्या ४ वर्षापासून त्यांच्या शाळेत निसर्गकट्टाच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाचे कार्य करीत आहेत.
Related News
जय श्रीराम जय गोमाता | गोवंश तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणीलाच अपमान कारक वागणूक
मूर्तिजापूर इंटरनॅशनल स्कूलमध्ये बाल वारकऱ्यांची दिंडी, रिंगण सोहळ्याने भाविक मंत्रमुग्ध
आषाढी एकादशी विशेष बातमी | अकोला ३२० वर्षांच्या परंपरेचे साक्षीदार विठ्ठल मंदिरात पहाटे महापूजा | ९२ वर्षांची अखंड हरिनाम परंपरा
बिहारमधील मतदार यादी पुनरिक्षणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान; ADRची याचिका
वारंवार तक्रार करूनही गटविकास अधिकारी यांची कारवाई करण्यास टाळटाळ
अकोला : 16 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग; ऑटोचालकाने घेतला हाताला आणि दंडाला चावा – आरोपीला अटक
अकोट | नऊ वर्षांच्या मुलाचा अमानुष खून – आईच्या जिवलगावरून जीव घेतला!
कापशी रस्त्यावरील अपूर्ण सर्विस रोड जीवघेणा ठरत आहे!
धामणा बुद्रुकमध्ये कॉलराचा उद्रेक; एका नागरिकाचा मृत्यू, गावात भीतीचं वातावरण
रिधोरा : नाग प्रजातीचा विषारी साप घरात आढळला;
पिंपळखुटा येथील चोरी गेलेले गोवंश पोलिसांनी पकडले
दरवर्षी ते ऑनलाईन चिमणी गणना व चिमणी घरटे कार्यशाळा घेत असतात.
यामुळे मुलांना पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली असून मनोज लेखनार स्वतः मुलांसोबत राजुरा घाटे परिसरात नियमित पक्षी निरीक्षण करतात.
याच निरीक्षणातून त्यांना शाळा परिसरात पांढरी चिमणी दिसली.
त्याची नोंद घेऊन त्यांनी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्यकारी सदस्य अमोल सावंत यांना दिली तेव्हा त्यांनी हि नोंद अत्यंत दुर्मीळ असल्याचे सांगितले.
या बद्दल अधिक माहिती देतांना श्री. मनोज लेखनार
यांनी सांगितले की, मानवाच्या त्वचेमध्ये मुख्यतः मेलॅनिन हा रंगद्रव्याचा प्रकार असतो.
या द्रव्याच्या कमी जास्त प्रमाणामुळे माणसाच्या त्वचेच्या रंगामध्ये काळे, गोरे, सावळे वा पांढरी त्वचा असणारे लोकं असतात.
याच प्रमाणे पक्षी व प्राण्यांच्या बाबतीत मेलॅनिन रंगद्रव्याचा पूर्णतः अभाव असतो. त्यामुळे कातडी किंवा पंख पुर्णतः पांढरे होतात.
त्याला इंग्रजीमध्ये अल्बिनिझम म्हणतात. पूर्ण अल्बनिझम क्वचितच आढळतो.
आता पर्यंत भारतामध्ये हाऊस क्रो, कॉमन किंगफिशर, रेड वेंटेड बुलबुल, मुकुट असलेला स्पॅरो लार्क,
ब्लू रॉक पिजन, सातभाई या पक्ष्यांच्या जातींमध्ये अल्बनिझम आढळून आला आहे.
शालेय परिसरात पांढरी चिमणी दिसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
या पांढऱ्या चिमणीचे दर्शन हे विद्यार्थ्यांच्या पक्षीनिरीक्षण व चिमणी संवर्धानाचे यश आहे.
शाळेच्या विविध पर्यावरणपूरक उपक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका कु.कल्पना येवले,
श्री. स्वप्नील दुतोंडे, सुनील गाडेकर, प्रसाद कुलकर्णी या शिक्षकांचे
तसेच गावचे सरपंच श्री. बंडू घाटे व शा. व्य. स. अध्यक्ष श्री. संदीप बरडे यांचे सहकार्य लाभते.
Read Also : https://ajinkyabharat.com/delhi-metromadhy-mahilanche-bhajan-kirtan-cisf-jawankadun-rebuked/