बाळापुर तालुक्यातील वाडेगाव येथील निर्गुणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहत जाणाऱ्या ३५ वर्षीय
युवकाची गावकऱ्यांनी जीवावर उदार होऊन थरारक सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसार, वाडेगाव येथील बजरंग ढोरे हे सकाळी शेत मजुरी करून घरी परतत होते.
दुपारी चारच्या सुमारास स्मशानभूमी जवळून नदी पार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.
मात्र, पूराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने ते वाहून जाऊ लागले.
त्यावेळी नदीकाठी उभे असलेले दत्ता लोखंडे, नकुल हुसे, मुकिंदा काळे, अर्जुन काळे, भूषण मसने, प्रथमेश कातखेडे, मनोज मानकर
ओम चिंचोळकर, शेख हातम, राजाभाई, मुझीपभाई या युवकांनी तत्काळ नदीत उड्या मारून ढोरे यांना सुरक्षित बाहेर काढले.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नदीकाठी मोठी गर्दी जमली.
दरम्यान,तलाठी शैलेश इंगळे,राम लंगोटे,लोपामुद्रा कोठुळे,कोतवाल नारायण घाटोळ,नारायण मानकर व सरपंच योगेश सर यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली.
गावकऱ्यांच्या वेगवान आणि धाडसी प्रयत्नांमुळे मोठा अनर्थ टळला.
Read Also :https://ajinkyabharat.com/local-gundachi-polisankadun-dhind-kan-pakadoon-public-affairs/